आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad Yadav Gave A Red Rose To Rabri Devi On New Year Celebrations In Patana

लालू प्रसाद यादवांनी पाटण्यात साजरे केले नववर्ष; राबडी देवींना दिला \'रेड रोज\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी आज (गुरुवारी) सकाळी नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी लालूंनी पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना गुलाब पुष्प दिले. लालू प्रसाद यादव यांच्या हृदयावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नंतर त्यांनी चार महिने दिल्लीत विश्रांती घेतली. त्यानंतर लालू प्रसाद यादव पाटण्यात दाखल झाले आहेत.
बिहाराचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी हे लालूंना भेटायला आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये राजकारणावर चर्चा झाली. नवे वर्ष 2015 हे ब‍िहारच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. वर्षाच्या शेवटी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजद आणि जदयू एकत्र येऊन भाजपचा विजयरथ रोकण्यासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, न्यू इयरचे सेलिब्रेशन करताना लालू यादव यांची छायाचित्रे...