आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad Yadav News In Marathi, Rashtraya Janta Dal, Lok Sabha Election

लालू निवडणुकीच्या रिगणात;पत्नी, मुलीसह राजदकडून 25 उमेदवारांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या 25 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांच्या पत्नी राबडीदेवी सारण येथून तर मुलगी मिसा भारती पाटलीपुत्र मतदारसंघातून लढणार आहेत. मिसा यांच्या पाटलीपुत्र येथील उमेदवारीवरून राज्यसभा खासदार रामकृपाल नाराज आहेत. ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असून कदाचित भाजपमध्येही जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बिहारच्या 40 पैकी 27 जागांवर राजद निवडणूक लढणार आहे. लालूंनी 12 जागा कॉँग्रेसला सोडल्या आहेत. पक्षाने पूर्व चंपारण आणि मधेपुराच्या उमेदवारांची घोषणा केली नाही. तिकीट वाटपामुळे पक्षात असंतोष वाढला आहे. रामकृपाल यांच्याव्यतिरिक्त राजदचे विधान परिषद सदस्य गुलाम गौस आणि माजी मंत्री सुरेश पासवान बंडाच्या पवित्र्यात आहेत.