आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालुप्रसाद यादवांच्या सात कन्या; राजकीय नेते, बिझनेसमन आहेत पती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- राष्‍ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपल्या अनोख्या स्टाइलमुळे देशात लोकप्रियता मिळवली आहे. आपला थाटबाट आणि बोलण्याच्या अनोख्या शैलीने लालुंनी बिहारसह संपूर्ण देशातील लोकांची मने जिंकली आहेत. राजकीय डावपेचात ते माहीर असून नेहमी चर्चेत असतात. लालूंचा आज 67 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी त्यांच्या सात कन्यांची माहिती देणार आहोत.

11 जून 1948 ला बिहारमधील गोपालगंजमध्ये लालू यादवांचा जन्म झाला. लोकनायक जयप्रकाश नारायणद्वारा सुरु झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन लालूंनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. वयाच्या 29 व्या वर्षीच ते लोकसभा निवडणुकीत निवडून आले. 1 जून 1973ला राबडी देवी यांच्यासोबत लालूंचा विवाह झाला. लालूंना सात मुली आणि दोन मुले आहेत. सर्व मुलींचा विवाह झाला आहे. लालूंची थोरली कन्या मीसा भारती या राजकारणात सक्रीय आहेत. लालुंचे पुत्र तेजस्वी यादव आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात दिसला होता. सात पैकी काहींचा विवाह राजकीय नेत्यासोबत तर काहींचा बिझनेसमनसोबत झाला आहे.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला लालुंच्या सात कन्यांविषयी माहिती देत आहोत .

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, लालूप्रसाद यादव यांच्या सात कन्यांविषयी...