आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंचा राजद दिवसा फुटला, रात्री एकजूट; 13 आमदार फुटले, रात्रीत 10 परतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमध्ये सोमवारी जोरदार राजकीय नाट्य घडले. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे 22 पैकी 13 आमदार सकाळी पक्ष सोडून गेले. मुख्यमंत्री नितीशकुमार सरकारला पाठिंब्याची घोषणाही त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता दिली. परंतु रात्र होताच 10 आमदार पक्षात परतले.

भाजपशी आघाडी तुटल्यापासून नितीश यांचे सरकार अल्पमतात आहे. राजदचे आमदार सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानी बंडखोर आमदारांची बैठक झाली. त्यांच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते. त्यावर 13 आमदारांच्या सहय़ा होत्या. तुरुंगातून सुटल्यापासून लालू काँग्रेसच्या वळचणीला गेले आहेत. राजद विलीन करण्याची त्यांची तयारी असल्याचे या आमदारांनी म्हटले होते. तथापि, नितीश यांनी मात्र या बंडाची आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले होते.

आमची स्वाक्षरी नाही..
विधानसभेची अधिसूचना जारी होताच 6 आमदारांनी घूमजाव केले. ललित यादव, अब्दुल गफूर, चंद्रशेखर, दुर्गाप्रसाद सिंह, फैयाज अहमद आणि अख्तर उल इस्लाम शाहीन यांनी पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचे म्हटले आहे. चौधरी यांनी धोक्याने सहय़ा घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. रात्री उशिरा आणखी 4 आमदार राबडीदेवींच्या घरी दाखल झाले.

बिहार विधानसभा : जागा 243
जदयू : 116, भाजप : 91, राजद : 22, काँग्रेस : 4, भाकप : 1, लोजपा : 1, अपक्ष : 6, रिक्त : 2