आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad\'s RJD. Thirteen RJD MLAs Pledge Support To The Nitish Kumar Government

\"ज्यांनी तुरुंगात डांबले त्यांच्या मांडीवर खेळत आहेत लालू\"

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दलाचे १३ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्ष सोडण्याचा निर्णय कळिवला आहे. राजदच्या आमदारांनी केलेल्या या सामुहिक बंडाळीमुळे बिहारच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. सुत्रांची माहिती आहे, की सर्व बंडखोर आमदार जनता दल संयुक्तमध्ये जाण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वात जनता दल संयुक्तचे सरकार आहे. मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदावार जाहीर केल्यानंतर नितीशकुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बिहारमध्ये त्यांचा पक्ष भाजपच्या सहकार्याने सत्तेवर आला असतानाही नितीशकुमार यांनी भाजपच्या पाठिंब्याशिवाय सरकार टिकवून ठेवले आहे.
आरजेडीला सोडचिठ्ठी देणा-या 13 आमदारांमध्ये डॉ. फैयाज अहमद, रामलखन रामरमण, अख्तरूल इमान, चंद्रशेखर, डॉ. अब्दुल गफ्फूर, ललित यादव, जितेन्द्र राय, अख्तरूल इस्लाम शाइन, दुर्गा प्रसाद सिंह, सम्राट चौधरी, जावेद अंसारी, अनिरूद्ध कुमार आणि राघवेन्द्र प्रताप सिंह यांचा समावेश आहे. या आमदारांनी कोणत्याही पक्षात जाण्याचा निश्चय आताच जाहीर केला नसला तरी, ते जेडी (यू)मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. आरजेडीचे विधानसभेत 22 आमदार आहेत त्यातील 13 जणांनी पक्ष सोडल्यामुळे राज्यात पक्ष कमकुवत झाला आहे. यातील बहुतेक यादव आणि मुस्लिम समाजाचे आमदार असल्यामुळे बिहारमधील जातीय समीकरणही आरजेडीच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे.
लालू यादव यांच्या आरजेडीला सोडचिठ्ठी देणा-या आमदारांनी आरोप केला आहे, की ज्या काँग्रेसने लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात टाकले. नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी नियमांमध्ये बदल केले, त्याच काँग्रेसच्या मांडीवर ते खेळत आहेत. तर, दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार धर्मनिरपेक्ष राज्यासाठी भाजपपासून वेगळे झाले. भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले त्याला त्यांनी विरोध केला आणि एनडीएतून वेगळे झाले. बिहारच्या जनतेने हे सर्व पाहिले आहे. त्यामुळे आगामी काळात धर्मनिरपेक्ष कोण असणार हे अल्पसंख्यांक समाजाला स्पष्ट झाले आहे.