आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी युगुलाला केले विवस्‍त्र, गावातून काढली धिंड, दोन दिवस ठेवले बांधून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसोटिया (उदयपूर) - येथील एक युवक विवाहित तरुणी पळून गेला. त्‍यामुळे जातपंचायतीने दोघांचीही गावातून विवस्‍त्र धिंड काढली. एवढेच नाही तर त्‍यांना दोन दिवस विवस्‍त्र अवस्‍थेत बांधून ठेवले. त्‍या नंतर तरुणाच्‍या कुटुंबीयांनी 80 हजार रुपये दंड भरल्‍यानंतर त्‍याला सोडून दिले. मात्र, तरुणीला अजूनही ओलीस ठेवले आहे.
नेमके काय आहे प्रकरण...
> गावातील लालू राम (28) याचे विवाहित असलेल्‍या शांता (26) ऊर्फ भुरीसोबत प्रेमसंबंध होते. ते 17 जूनला पळून गेले.
> ग्रामस्‍थांनी त्‍यांना 20 जून रोजी सकाळी भटेवरजवळ पकडून कसोटिया गावात घेऊन गेले.
> गावातील मंदिरासमोर दोघांनाही बांधून ठेवले.
> त्‍या नंतर त्‍यांना विवस्‍त्र करून त्‍यांची गावातून धिंड काढण्‍यात आली.
> एवढेच नाही तर दोघांनाही विवस्‍त्र अवस्‍थेत रात्रभर बांधून ठेवले. तरुणाच्‍या कुटुंबीयांना या बाबत माहिती मिळताच ते बुधवारी घटनास्‍थळी आले.
> त्‍यावेळीसुद्धा दोघेही विवस्‍त्र बांधूनच होते.
जातपंचायतीने मागितले होते दोन लाख रुपये
तरुणाला सोडायचे असेल आणि कुटुंबावर बहिष्‍कार टाकायचा नसेल तर दोन लाख रुपये दंड भरा, असे फर्मान जात पंचायतीने काढले. त्‍यावर तरुणाच्‍या कुटुंबीयांनी कसा तरी 80 हजार रुपये दंड भरला. त्‍यानंतर त्‍याला सोडून दिले.
तरुणीच्‍या आई आणि भावांनाही ठेवले ओलीस
तरुणीची सुटका करण्‍यासाठी तिची आई, दोन भाऊ आणि तीन नातलग आले होते. पण, त्‍यांनाही जातपंचायतीने एका खोलीत डांबले. गुरुवारी पोलिसांनी गावात येत या सर्वांची सुटका केली. परंतु, तरुणी अजूनही त्‍यांच्‍याच ताब्‍यात असल्‍याचे सांगितले जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)