आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू, शॉटगन, जयाप्रदा, भोजपुरी चित्रपटात एकत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- अभिनेत्यातून नेते झालेले शॉटगन शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री जयाप्रदा राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांना घेऊन भोजपुरी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या तिघांव्यतिरिक्त भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी या चित्रपटात काम करत आहेत. जयाप्रदा यांची ही निर्माती आहे. समाजवादी पार्टीचे माजी नेते अमरसिंग यांचीही यात भूमिका असेल. मतुदेवो या तेलगु चित्रपटाचा हा भोजपुरी रिमेक असून त्याचे 70 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असल्याचे तिवारीने सांगितले. चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. संगीतकार बप्पी लहरी यांनी संगीत दिले आहे. लालूप्रसाद यादव यांनी एका उद्योगपतीची व्यक्तिरेखा निभावली आहे. सुनील शेट्टी अभिनीत पद्श्री लालूप्रसाद यादव या हिंदी चित्रपटात लालूप्रसादांनी काम केले आहे.