आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालुंच्या हत्येचा कट रचला जातोय, मोदींची कातडी सोलून काढू : तेजप्रताप यादव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - केंद्र सरकारने लालू यादव यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नवे वादळ आले आहे. याबाबत बोलताना लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादवने पंचप्रधान नरेंद्र मोदींनी खुली धमकी दिली आहे. विधानसभा परिसरात माध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले की, ते मोदींची कातडी सोलून काढतील. 


अघटीत घडल्यास मोदी जबाबदार 
- तेजप्रताप यादवने म्हटले, माझे वडील लालूंच्या हत्येचा कट रचला जात आहे. या कटामुळे त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्यात लालू यादव यांचाही समावेश असतो. 
- जर काही अघटीत असे घडले तर त्यासाठी नरेंद्र मोदीच जबाबदार असतील असे ते म्हणाले. लालूंच्या हत्येचा कट रचला जात आहे. आम्ही कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ. 


सत्ता गेल्याने लालूंचे कुटुंब फ्रस्ट्रेशनमध्ये 
- तेजप्रताप यांच्या वक्तव्याबाबात बोलताना जेडीयूचे प्रवक्ते संजय सिंह म्हणाले, पंतप्रधानांबाबत असे काही बोलणे अत्यंत चुकीचे आहे. सत्तेतून बाहेर गेल्याने लालूंचे कुटुंब फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. 
- ते म्हणाले, तेजप्रताप यांनी काही दिवसांपूर्वीच सुशील मोदींच्या घरात घुसून त्यांना मारण्याची धमकी दिली होती. लालुंनी रविवारी म्हटले की, तेजप्रतापला सुशील मोदी घाबरले आहेत. हे लोक राजकारण गढूळ करत आहेत, असेही ते म्हणाले.  


जनता धडा शिकवेल : सुशील मोदी
उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले की, पंतप्रधानांसाठी अशा प्रकारचे शब्द काढणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. नरेंद्र मोदींना सोनियां गांधींनी मौत का सौदागर म्हटले होते. त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. तेजप्रताप सत्ता गेल्याने फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. जनताच त्यांना धडा शिकवेल. असेच राहिले तर भविष्यात विधानसभाही जिंकता येणार नाही. 


काय आहे प्रकरण?
- केंद्र सरकारने आरजेडी प्रेसिडेंट लालू प्रसाद यादव आणि राज्यसभेचे खासदार शरद यादव यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझींना मिळालेली झेड प्लस सिक्युरिटीही कमी केली आहे. 
- लालूंची सिक्युरिटी झेड प्लस कॅटेगरीतून झेड कॅटेगरीवर आणली आहे. 
- झेड प्लस कॅटेगरीमध्ये 10 एनएसजी कमांडो आणि पोलिसांसह 55 सिक्युरिटी मेंबर्स असतात. तर झेड कॅटेगरीमध्ये 22 सिक्युरिटी गार्ड्स असतात. त्यात 4-5 एनएसजी कमांडो असतात. 

 

बातम्या आणखी आहेत...