आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 तास, 14 पक्ष, 28 वक्ते, गर्दीचा बनाव; लालूंनी ट्विट केले बनावट फोटो: 25 लाख गर्दीचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालूप्रसाद यांनी रॅलीचे जास्त गर्दी असलेले छायाचित्र टि्वटरवर पाेस्ट केले. मात्र, एका वृत्तसंस्थेने गर्दीचे वास्तव समाेर अाणले. - Divya Marathi
लालूप्रसाद यांनी रॅलीचे जास्त गर्दी असलेले छायाचित्र टि्वटरवर पाेस्ट केले. मात्र, एका वृत्तसंस्थेने गर्दीचे वास्तव समाेर अाणले.
पाटणा- राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात गांधी मैदानावर “देश बचाओ, भाजप भगाओ’ रॅलीतून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. सपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह १४ पक्ष सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी दाखवण्याच्या हट्टापायी त्यांनी बोगस गर्दी दाखवली. या रॅलीत २५ लाख जनता सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. 
 
रॅलीमध्ये जदयू नेता शरद यादव सहभागी झाले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. रॅली भाजपविरोधी असली तरी जोरदार टीका मात्र नितीशकुमार यांच्यावरच झाली. त्यांना धोकेबाज, जनादेश डावलून पाठीत सुरा खुपसणारा, पल्टूमार आदी विशेषणे बहाल करण्यात आली. नितीश यांचे राजकारण संपले. आमच्या कुटुंबीयांवर खोटा खटला चालवला आहे. छापे घालण्यात आले, तरी मी भीत नाही, असे लालू म्हणाले. ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर टीका केली.

आमचाच जदयू हाच खरा पक्ष आहे आणि  नितीशकुमार आम्हालाचभीती दाखवत आहेत. 
- शरद यादव, जदयू नेते

नितीशकुमार यांनी जनतेला धोका दिला. भाजप, देशाचा पाया खिळखिळा करत आहे. 
-गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे नेते

>लालू यादव यांचे भाषण : जातीयवाद विराेधी रॅली
- २१ अाॅक्टाेबर १९९०, गांधी मैदान...
‘मी अडवाणी यांना विनंती करताे की, त्यांनी रथयात्रा स्थगित करून दिल्लीला परत जावे. देशहितासाठी माणसेच राहणार नाहीत तर काम कसे हाेईल? माणूसच नाही तर मंदिरात घंटा काेण वाजवेल? माणूसच राहणार नाही तर मशिदीत प्रार्थना करण्यासाठी काेण जाईल?

>तेजस्वी यादव यांचे भाषण : देश बचाओ, भाजपा भगाओ रॅली
- २७ अाॅगस्ट २०१७, गांधी मैदान...
‘हे लाेक हिंदूंना मुस्लिमांशी लढवू इच्छितात. माणुसकी ही सर्वात माेठी गाेष्ट असते. माणूसच नसेल तर मंदिरात घंटा काेण वाजवेल? माणूसच नसेल तर मशिदीत प्रार्थना काेण करेल? गुरुद्वारात डाेके काेण टेकवणार? माणूसच राहणार नाही तर चर्चमध्ये प्रार्थना काेण करेल?’ 

लालूप्रसाद यांनी  गरीब, लाठीच्या नावावरही रॅली काढल्या आहेत
- पाटणा : लालूप्रसाद यादव यांनी रॅलीची नावे वेळ आणि मुद्दे पाहून ठेवली होती. ती खूप रंजक होती. 
- गरीब रॅली (१९९५) : रॅलीला  गरीब असा शब्दप्रयोग करण्यामागे लालू एकमेव गरिबांचे हितचिंतक आहेत, हे कळावे. 
- गरीब रॅला (१९९६): लालू यांनी आपल्या मतपेढीला एकत्र ठेवण्यासाठी रॅलीच्या ऐवजी रॅला असा शब्दप्रयोग केला.
- महागरीब रॅला (१९९७): भाजप आणि नितीश यांनी घूमजाव केले होते. लालूंनी गरीबमध्ये “महा’शब्द वापरला.
- लाठी रॅला (२००३): गरिबांचा जनाधार टिकवण्यासाठी लालूंनी लाठी रॅला काढला.
- इशारा रॅली (२००७) : लालू यादव यांनी नितीश राजमध्ये यादव आणि मुस्लिम मतदारांत भेदभाव सहन केला जाणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
- परिवर्तन रॅली (२०१२): नितीशकुमार यांची भाजपशी मैत्री तुटली होती. आता निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी असे नाव दिले.
- देश बचाओ, भाजप भगाओ (२०१७) : आता नितीश- भाजप मैत्रीमुळे लालू सत्तेतून बाहेर झाले. त्यामुळे भाजप अँटी ग्रुप एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...