आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंच्या वॉलवर रंजक, तिखट ट्विट्सचा भडिमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - डिअर लालूजी, तुमच्या ट्विटर प्रोफाइलवर काही गोष्टी मिसिंग आहेत. त्यात चारा घोटाळ्याचा माजी कैदी, असे का म्हणून जोडत नाही आहात? कुंभकोणम (चेन्नई) येथील राहणारे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपला आदर्श मानणारे राजा जनार्दनने हा ट्विट लालूंच्या वॉलवर केला. तीन दिवसांपूर्वी ट्विटरच्या विश्वात दाखल झालेले लालू यांचे 6 हजार फॉलोअर झाले आहेत. राजदच्या प्रमुखांनी या ट्विटवर मात्र काहीही उत्तर दिले नाही. अशा अनेक तिखट, रंजक ट्विट्सचा भडिमार त्यांच्या वॉलवर दिसतो. आयुष लिहितो, अरे, तुम्ही इंग्रजीतून लिहिता, आम्हाला तर माहीतही नव्हते. अरविंद झा लिहितात - वॉव, हवामान बदलले आहे. आता थंडी संपेल. लालूजी तुमचे स्वागत. दीपांशू त्यागी म्हणतात, लोकसभेतून बाहेर पडल्यानंतर ट्विटरवर तुम्ही अधिक वेळ द्याल. मिस मुंबई नावाने एक ट्विट आहे- लालूप्रसाद ट्विटरवर उपलब्ध आहेत. यातून ट्विटर सेक्युलर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. डॉ. प्रवीण पाटील म्हणतात, 80 ते 90 दशकातील एक नेते विकासाच्या राजकारणात स्वत:ला अ‍ॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटरवर एकाच गोष्टीची कमतरता होती. लालूप्रसाद यादव यांची, असे मुकेश यांनी ट्विट केले. अमरेश कुमार यादव लिहितात, लालूजी नितीशकुमारांवर उपचार करा.
अनुपम खेर म्हणतात, पद्धत भलेही विनोदी असो, परंतु जे बोलता ते खरे खरे. चारा घोटाळ्यात विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही काय
करताय, असा प्रश्न तुषार हरी याने विचारला आहे.
असे देतात उत्तर
अभिमन्यू ठाकूर ट्विट करून म्हणतात, बिहार आजही गरिबीचे दुसरे नाव आहे. त्यावर लालूंच्या शब्दातील उत्तर होते- गुगल के जमाने के लडकन लोग हो, बिहार की डेवलपमेंट ग्रोथ सर्च करो. जवाब मिल जाएगा.
लालू ई-श्टाइल
० जो लोक सोचते हैं मैं मजाकिया हूँ, ऐसे लोगों का जिनको न अक्ल से, शक्ल से, न देश से मतलब है- ऐसे लोगों का मैं ट्रीटमेंट करता रहा हूं.
०आखिर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई होने से पहले हम सब उस परवरदिगार के बनाए इन्सान हैं. फिर हम आपस में क्यों लडें-झगडें सोचो...
नितीश ते मोदींपर्यंतचे प्रश्न
०कुमार अंकित यांना जाणून घ्यायचे होते की, नितीशकुमार यांचे काय करावे या वेळी?
०अनुपम खेर यांचे ट्विट- पांढ-या केसांच्या प्रकरणावर एवढेच म्हणता येईल की, गरिबी जात पाहून येत नाही?
मिथुनदा लवकरच खासदार
कोलकाता । राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मिथुनदांचे नाव जाहीर केले.
पश्चिम बंगालमधून या वेळी राज्यसभेसाठी पाच सदस्यांची निवड होणार आहे. यातील एक जागा मिथुन यांना देण्यात येणार आहे, असे ममतांनी फेसबुकवरून पोस्ट करून जाहीर केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे, असे बॅनर्जी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.