आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ज्योतिष्याने पाहिली होती लालूंची कुंडली, शत्रुघ्न सिन्हाबद्दल हे म्हटले होते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्व. पंडित विष्णुकांत मिश्रा. - Divya Marathi
स्व. पंडित विष्णुकांत मिश्रा.
पाटणा - 52 वर्षांपूर्वी देशाचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित विष्णुकांत शास्त्री यांनी लालू प्रसाद यादव यांच्याबाबत जी भविष्यवाणी केली होती, ती एकदम खरी ठरली. तीन दशकांआधी जे भाकीत त्यांनी अॅक्टर शत्रुघ्न सिन्हा यांची कुंडली पाहून वर्तवले होते, ते काळाबरोबर खरे ठरले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर असा कोणताच नेता नव्हता जो विष्णुकांतजी यांना भेटण्यासाठी येत नव्हता. मग ते राष्ट्रपती असोत वा पंतप्रधान.
 
काय म्हटले होते शत्रुघ्न सिन्हाबाबत...
शत्रुघ्न सिन्हाने divyamarathi.com ला सांगितले की, तब्बल तीन दशकांआधीची ही गोष्ट आहे. मी माझ्या वडिलांसह पंडितजींकडे गेलो होतो. त्यांनी कुंडली आणि हात पाहिल्यावर म्हटले होते की, हा खूप मोठा माणूस होईल. याचे नोकरचाकरसुद्धा विमानातून प्रवास करतील. पंडित विष्णुकांतजी यांच्या भाकितावर त्या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांना राग आला होता.
- शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, त्या वेळी मी खूप लहान होतो. तेव्हा त्यांचे वडील बी.पी.सिंह चारही भावांना घेऊन पंडितजींच्या घरी गेले होते. त्यांनी माझा हात पाहून म्हटले होते की, याच्या दहाही बोटांमध्ये शंख आहे.
- याचा तर राजयोग आहे, हा खूप पैसा कमावणार आणि याचे नावही खूप मोठे होईल. त्या वेळी पंडितजी त्यांच्याबाबत जे काही सांगितले त्यावरून चिडवताहेत असे वाटल्याने शत्रुघ्न सिन्हा यांना वाईट वाटले होते.
 
नेहरूंपासून ते लालू यांच्यापर्यंत कुंडली पाहिल्या आहेत...
- पंडित विष्णुकांत मिश्रा यांच्याबाबत असे सांगितले जाते की, त्यांच्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू ते लालू प्रसाद यादव पर्यंतची कुंडली होती. लालू प्रसाद जेव्हा पाटणा विद्यापीठात छात्र संघाचे नेता होते तेव्हा त्यांच्याकडे जाणे-येणे होते. पंडित विष्णुकांत मिश्रा यांनी लालू प्रसाद यांच्याबाबत 1965 मध्ये राजयोगाची भविष्यवाणी केली होती. यानंतर लालू प्रसाद पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि एक वेळ तर अशी आली की लालू प्रसाद किंग मेकरच्या रूपात समोर आले.
- आता पंडित विष्णुकांत मिश्रा या जगात नाहीत. 1980 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची मुले या परंपरेला पुढे नेत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...