आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Yadav Daughter Husband To Fight Against Him

लालूंविरोधात प्रचार करणार जावई, याच मुलीसोबत झाले होते लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालू यादव यांची मुलगी राजलक्ष्मी. इन्सेट - तेजप्रताप यादव - Divya Marathi
लालू यादव यांची मुलगी राजलक्ष्मी. इन्सेट - तेजप्रताप यादव
पाटणा - काही दिवसांपूर्वी महाआघाडीचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या समाजवादी पक्षाने आघाडीला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र आघाडी तयार केली आहे. जागावाटपावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आता समविचारी पक्षांची सेक्युलर आघाडी स्थापन केली आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे.
समाजावादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि महाआघाडीचा प्रमुख घटकपक्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव हे काही महिन्यांपूर्वीच व्याही झाले होते. मात्र राजकारणापुढे नातेसंबंध थिटे पडतात. आता लालू यादव यांचे जावई तेजप्रताप आणि व्याही मुलायमसिंह, शिवपालसिंह, रामगोपालसिंह यादव त्यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी बिहारमध्ये जातील. लालू यांची धाकटी मुलगी राजलक्ष्मीचा विवाह समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार तेजप्रताप यांच्यासोबत झाला होता.
कोण आहे तेजप्रताप
मुलायमसिंह यादव यांचे दिवंगत मोठे बंधु रतनसिंह यांचा दिवंगत मुलगा रणबीरसिंह यांचे तेजप्रताप चिरंजीव आहेत. नोएडाच्या अमेटी विद्यापीठातून बी.कॉम केल्यानंतर तेजप्रताप यांनी इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठातून एमबीए केले. 2011 मध्ये उत्तरप्रदेशातील सैफई चे ब्लॉक अध्यक्षम्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आता मुलायमसिंह यांचा पारंपरिक मतदारसंघ मैनपुरी येथून ते लोकसभा सदस्य आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, तेजप्रताप आणि राजलक्ष्मी यांचे फोटो