आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू प्रसाद यादव तुरुंगात बनले माळी, दिवसाची 14 रुपये होते कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- कोट्यावधी रुपयांचा चारा घोटाळ्यात शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव तुरुंगात चक्‍क माळी झाले असून ते दिवसाचे 14 रुपये कमावतात. लालू यादव यांचा मुक्‍काम रांची येथील तुरुंगात आहे. तेथे त्‍यांना बागकामाची जबाबदारी देण्‍यात आली आहे. तुरुंगातील फुलझाडे, भाज्‍या आणि हिरवळीच्‍या देखभालीचे काम त्‍यांना देण्‍यात आले आहे.

तुरुंगाधिका-यांनी लालू यादव यांना आठवडाभरापूर्वीच बागकाम सोपविले होते. लालूंचा जामीन अर्ज उच्‍च न्‍यायालयाने 30 ऑक्‍टोबरला फेटाळला होता. त्‍यानंतर दुस-याच दिवसापासून लालुंनी काम सुरु केले. बिहारमध्‍ये 1990 च्या दशकात जवळपास 900 कोटी रुपयांचा चारा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तर जगन्नाथ मिश्र यांना न्यायालयाने चार वर्षाचा तुरुंगवास ठोठावला आहे. या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे.