आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंनी घेतला शहांना चिमटा, \'एवढ्या जाड्या व्यक्तीने कशाला लिफ्टने जावे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपाध्यक्ष अमित शहा - Divya Marathi
भाजपाध्यक्ष अमित शहा
पाटणा - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी पाटण्यातीव शासकीय विश्रामगृहाच्या लिफ्टीमध्ये अडकले होते. त्यावरुन राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी त्यांना चिमटा काढला आहे. शुक्रवारी लालू यादव म्हणाले, अमित शहा यांच्यासारख्या जाड्या व्यक्तीने पाटण्याच्या लिफ्टमध्ये घुसायलाच नको होते. बिहारमधील लिफ्ट छोट्या असतात, त्या एवढ्या जाड्या व्यक्तीचे ओझे पेलू शकत नाही.
तपासात कळाले, की लिफ्टमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे लिफ्ट अडकली होती. लिफ्टची क्षमता 340 किलोंची होती. अमित शहा यांच्यासोबत आणखी पाच लोक लिफ्टमध्ये घुसले आणि त्यामुळे लिफ्ट अडकली होती.
40 मिनीट होते लिफ्टमध्ये अडकून
शहा आणि त्यांच्यासोबतचे पाच लोक 40 मिनीट लिफ्टमध्ये अडकून होते. भाजपाध्यक्ष गुरुवारी पाटणा स्टेट गेस्टहाऊसमध्ये मुक्कामी होते. रात्री ते ग्राऊंड फ्लोअरवर येण्यासाठी लिफ्टमध्ये चढले मात्र लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरपर्यंत आलीच नाही. निर्धारित जागेपेक्षा सहाइंच वरती लिफ्ट अडकली. लिफ्टचा दरवाजा उघडणे देखील अवघड झाले होते. शहांसोबत त्यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि सौदन सिंह होते. ही सर्व मंडळी 40 मिनीटे लिफ्टमध्ये फसलेली होती.
भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य सी.पी.ठाकूर यांनी या घटनेमागे षडयंत्र असल्याचा आरोप केला. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. जर आणखी थोडावेळ ते तिथेच अडकून असते तर त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असा दावा त्यांनी केला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्या लिफ्टमध्ये अडकले होते शहा आणि स्टेट गेस्ट हाऊस