आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अइबे त आव, आदत सुधार के रहे के पडी’ हमार नीती ह- जीआे आैर जीने दो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - ‘अइबे त आव, बाकी आदत सुधार के रहे के पडी.’ राजद सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षाचे दरवाजे खुले करताना लालू प्रसाद यादव यांनी अशी तंबी दिली. त्यांच्या या वाक्यावर राजद कार्यालयात उपस्थित राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

लालू राजदच्या २० व्या वर्धापन दिवस समारंभात बोलत होते. लालू म्हणतात- हमार नीती ह- जीआे आैर जीने दो. रिलायन्स वाला जीआे नहीं, असे म्हणत त्यांनी शाब्दिक कोटीही केली. त्या जीआेमध्ये ‘एक आदमी जीआे, बाकी मरो’ असे अभिप्रेत असल्याचे म्हणत लालूशैलीत त्यांनी संबोधित केले. केंद्रातील मंत्री म्हणजे कॉल ड्रॉप मंत्री झाले आहेत. एकीकडे अदाणींचे २००० कोटी माफ केले जातात तर दुसरीकडे रिलायन्सला बिहारमध्ये लाभासाठी पोहाेच दिली जात आहे. जो अधिकारी राजद कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी मुसळधार पावसात वॉटरप्रूफ शामियान्यात भाषण दिले. महायुतीचे सरकार आल्याने आकाशातून अमृत बरसत असल्याचे ते म्हणाले. मोदींनी शपथग्रहण केली, त्यानंतर देशभरावर २ वर्षे अवर्षण पसरले, असे लालू म्हणताच सभेत हशा पिकला.
मुसळधार पावसात राजदचा वर्धापन दिवस साजरा झाला. लालू म्हणाले, महायुतीचे सरकार आल्याने अमृत बरसत आहे. मोदींनी शपथग्रहण केल्यानंतर २ वर्षे देशभरात दुष्काळ पडला.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...