आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंविरुद्धचा एक खटला मागे, आधी मुलांना वगळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राज्य सरकारने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध दाखल आणखी एक खटला राज्य सरकारच्या अर्जावरून मागे घेण्यात आला. याआधी लालू आणि त्यांच्या दोन पुत्रांविरुद्धचा खटला मागे घेण्यात आला होता.

जिल्हा दंडाधिकारी गायत्री कुमारी यांनी परसा बाजार पोलिसांत दाखल गुन्हा मागे घेण्याचे निर्देश दिले. फुलवार शरीफच्या मंडळ अधिकारी सुनीता प्रसाद यांच्या तक्रारीवरून ५ एप्रिल २०१४ रोजी लालूंविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील पदयात्रेचे छायाचित्रण करण्यासाठी प्रसाद यांनी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती. त्यास लालूंकडून विरोध करण्यात आला. लालूंच्या कन्या मिसा भारती यांना या निवडणुुकीत हार पत्करावी लागली.
केंद्रीय राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी त्यांचा पराभव केला. या प्रकरणी २७ मे २०१५ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकिलांनी खटला बंद करण्याची मागणी केली. १९ जानेवारी रोजी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी लालूप्रसाद, त्यांच्या दोन पुत्रांसह राजदच्या २६२ जणांविरुद्धचा खटला मागे घेण्याचा अर्ज मंजूर केला होता. दरम्यान, निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये राजद आणि जदयूमधील संबंध अत्यंत कटुतेचे होते. परंतु महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर उभय पक्षांतील वाटाघाटीनुसार सरकार आल्यानंतर ही कारवाई झाली.