आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laluprasads Daughter Misa Bharti Seeks An Apology From PM Narendra Modi On His Bechari Beti Remark

लालू कन्या पंतप्रधानांवर भडकल्या, \'बेचारी बेटी\' संबोधित केल्याचा आला राग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीत रंगात आली आहे. बुधवारी, 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये तिसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. राजकीय नेते प्रचार सभांमध्ये एकमेकांवर तीव्र शब्दात प्रहार करताना दिसत आहे.

दुसरीकडे, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू यादव यांची कन्या मीसा भारती या चांगल्याच भडकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीसा भारती यांना रविवारी झालेल्या एका सभेत 'लालू यांची बेचारी बेटी' असे संबोधित केले होते. यावर मीसा यांनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी मीसा यांनी केली आहे.

दरम्यान पंतप्रधान यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप या आधी मीसा यांचे वडील लालूप्रसाद यादव यांनी केला होता.

आरएसएसच्या विचारसरणीच्या लोकांची मानसिकता बदलता येत नाही...
लालू आपल्या मुलीचा प्रचार करण्यात कमी पडले. त्यामुळे बेचारी कन्या मीसा भारती यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. याला मीसा भारती यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारसरणी असलेले लोकच असा विचार करतात. त्यांची मानसिकता आपण बदलू शकत नाही.

मीसा भारती म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी नौबतपूर येथे केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. मोदी संपूर्ण महिला वर्गाचाच अपमान केला आहे. 'बेचारी लोकसभा निवडणूक हरली', असा मोदींची मीसा भारती यांच्या संदर्भात शब्दप्रयोग केला होता. निवडणुकीत हरलेली महिला बेचारी होते काय? असा सवालही मीसा यांनी उपस्थित केला आहे.