आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu\'s Both Sons Tejashwi, Tejpratap Likely To Be Ministers As Nitish\'s Oath Ceremony Today

नितीशकुमार झाले पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री, लालूपुत्र तेज प्रताप शपथ घेताना चुकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शपथ घेताना तेज प्रताप यादव - Divya Marathi
शपथ घेताना तेज प्रताप यादव
पाटणा - जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज (शुक्रवार) येथील गांधी मैदानावर दुपारी दोन वाजता पाचव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्‍यान, लालूंचे मोठे पुत्र आणि पहिल्‍यांदाच आमदार झालेले तेज प्रताप यांनी शपथ घेताना चूक केली. त्‍यामुळे राज्‍यपालांनी त्‍यांना पुन्‍हा शपथ दिली.
तेज प्रताप यांनी नेमकी काय चूक केली ?
लालू यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांना राजपालांनी दोनदा शपथ दिली. पण, दोन्‍ही वेळी त्‍यांनी एकच चूक केली. तेज प्रताप यादव यांनी कागदावरील शपथेचा मजकूर वाचताना 'अपेक्षित' या शब्दाचा 'उपेक्षित' असा उच्चार केला. त्यामुळे राज्यपाल रामनाथ गोविंद यांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. यानंतरही त्‍यांनी हीच चूक केली. दरम्‍यान, राज्यपालांनी त्यांना थांबवले आणि योग्य उच्चार सांगितला. यानंतर तेज प्रताप यादव यांनी बरोबर उच्चार करून उर्वरित शपथ पूर्ण केली.
कोण कोण झाले मंत्री?

तेजस्‍वी यादव
तेजस्वी हे लालू यादव यांचे मोठे छोटे पुत्र आहेत. आपल्‍या नंतर आरजेडीमध्‍ये त्‍यांनाच स्‍थान मिळावे, अशी लालू यांची इच्‍छा आहे. त्‍यामुळेच तेजस्‍वी यांना उपमुख्‍यमंत्री बनवण्‍यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
तेज प्रताप यादव
हे लालू यादव यांचे मोठे पुत्र आहेत. पहिल्‍यांदाच आमदार म्‍हणून ते निवडून आलेत. महुआ मतदार संघातून त्‍यांना विजय मिळाला.
अब्दुल बारी सिद्दिकी
राजदच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांपैकी हे एक आहेत. यावेळी अलीनगर विधानसभा मतदार संघातून त्‍यांनी निवडणूक जिंकली. अनेक वेळा ते आमदार आणि मंत्री झालेले आहेत. 1995, 2000, 2005, 2010 आणि आता 2015 असे 20 वर्षांपासून ते आमदार आहेत. लालू यांच्‍या निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत.
विजेंद्र प्रसाद यादव
हे नितीशकुमारांचे निकटवर्तीय असून, जदयूचे ज्‍येष्‍ठ नेते आहेत. त्‍यांनी महत्‍त्‍वाच्‍या खात्‍याचे मंत्रीपद सांभाळलेले आहे. विजेंद्र हे 1990 आणि 1995 मध्‍ये राजदकडून आमदार होते. नंतर 2000, 2005, 2010, 2015 मध्‍ये सुपौल मतदारसंघातून जदयूच्‍या तिकिटावर विजयी झाले.
राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह
है नितीश कुमारांच्‍या निकटवर्तीयांपैकी एक असून, विधान परिषदेचे सदस्‍य आहेत. शिवाय जदयू सरकारमध्‍ये मंत्री आहेत. काही वर्षांपूर्वी त्‍यांचे नितीश यांच्‍यासोबत मतभेद झाले होते. मात्र, आता ते पुन्‍हा एक झाले आहेत. वर्ष 2014 मध्‍ये लोकसभा निवडणुकीत त्‍यांचा पराभव झाला होता. त्‍यानंतर ते विधान परिषदेवर निवडून आले. पुढे त्‍यांना मंत्रीमंडळात स्‍थान मिळाले. आता त्‍यांनी पुन्‍हा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
श्रवण कुमार
हे जदयू सरकारमध्‍ये मंत्री राहिलेले आहेत. वर्ष 1995, 2000 मध्‍ये समता पार्टीकडून त्‍यांनी निवडणूक जिंकली. पुढे त्‍यांनी जदयूमध्‍ये प्रवेश करून राजगीरमधून 2005, 2010 आणि 2015 विधानसभा मतदार संघात सगल तिस-यांना विजय मिळवला.
जय कुमार सिंह
हे जदयू सरकारमध्‍ये मंत्री राहिलेले आहेत. वर्ष 2000 मध्‍ये ते राजकारणात आले होते. दिनारा मतदारसंघातून त्‍यांनी 2005, 2010 आणि 2015 मध्‍ये जदयूच्‍या तिकिटात निवडणूक जिंकली.
कृष्णनंदन वर्मा
हे कोइरी जातीचे प्रभावशाली नेता आणि जेडीयूचे निष्‍ठावंत आहेत. त्‍यांनी घोसीमधून निवडणूक जिंकली. या मतदारसंघात 30 वर्षांपासून वर्मा कुटुंबाचा सदस्‍य निवडून येत आहे. या ठिकाणाहून त्‍यांची पत्‍नी आणि मुलगाही निवडून आलेला आहे.
महेश्वर हजारी
यांनी कल्‍याणपूर विधानसभा मतदारसंघात जदयूकडून निवडणूक लढवत रामविलास पासवान यांचे पुतणे प्रिंस राज यांचा पराभव केला. 2009 मध्‍ये हजारी यांना समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता.
अब्दुल जलील मस्तान
हे कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आहेत. अनेक वेळा ते आमदार राहिले आहेत. यावेळी अमनौर मतदारसंघातून त्‍यांना विजय मिळाला. 1990 मध्‍ये ते पहिल्‍यांदा आमदार झाले होते. त्‍या नंतर त्‍यांनी वर्ष 2000, 2005 आणि 2015 मध्‍ये कॉंग्रेसच्‍या तिकिटावर विजय मिळवला.
राम विचार राय
राम विचार राय हे राबडी सरकारमध्‍ये मंत्री होते. मुजफ्फरपूर जिल्‍ह्यात त्‍यांची चांगली पकड आहे. यादव समाजातील मोठ्या नेत्‍यांपैकी ते एक आहेत.
शिवचन्द्र राम
शिवचन्द्र राम हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. राजदच्‍या युवा शाखेचे ते राज्‍यध्‍यक्षही होते.
मदन मोहन झा
मदन मोहन हे बिहारमध्‍ये कॉंग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांपैकी आहेत. सध्‍या ते विधान परिषदचे सदस्‍य आहेत.
आलोक कुमार मेहता
यांनी समस्तीपूरच्‍या उजियारपूर मतदारसंघातून आरजेडीच्‍या तिकिटावर विजय मिळवला. ते दिग्गज समाजवादी नेता आणि माजी मंत्री तुळसीदास मेहता यांचे पुत्र आहेत. त्‍यामुळे त्‍यांना राजकारणाचा वारसा आहे. समस्तीपूर लोकसभा मतदार संघातून एक वेळ त्‍यांना विजय मिळाला होता. शिवाय त्‍यांनी युवा राजदचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेले आहे.
चंद्रिका राय
चंद्रिका राय या यापूर्वीसुद्धा मंत्री राहिलेल्‍या आहेत. राजदच्‍या मोठ्या नेत्‍यांपैकी त्‍या एक आहेत. सारण जिल्‍ह्यात त्‍यांचे वर्चस्‍व आहे.

अवधेश कुमार सिंह
हे कॉंग्रेसचे नेता आहेत. आता दुस-यांना आमदार म्‍हणून ते निवडून आले आहेत. यावेळी वजीरगंज मतदार संघातून त्‍यांना विजय मिळाला. वर्ष 2010 मध्‍ये त्‍यांचा पराभव झाला होता.
शैलेश कुमार
हे जेडीयूचे आमदार असून, मुंगेर जिल्‍ह्यातील जमालपूर मतदार संघाचे आमदार आहेत. यापूर्वीसुद्धा या ठिकाणाहून ते निवडून आले होते.
संतोष निराला
राजपूर मतदारसंघा यांच्‍यासाठी बाल्‍लेकिल्‍ला आहे. या ठिकाणी जदयूच्‍या तिकिटावर ते पुन्‍हा निवडून आले आहेत. वर्ष 1991 मध्‍ये राजकारणात आले. नंतर 2005 मध्‍ये बीएसपीचे जिल्‍हाध्यक्ष, 2007 मध्‍ये महासचिव आणि 2010 मध्‍ये पहिल्‍यांदा आमदार बनले.
मुनेश्वर चौधरी
मुनेश्वर चौधरी हे सारण जिल्‍ह्यातील गरखाचे आमदार आहेत. 60 वर्षीय मुनेश्वर राजदचे ज्‍येष्‍ठ नेते आहेत. लालूंचा त्‍यांच्‍यावर खूप विश्‍वास आहे.
डॉ. अब्दुल गफ्फूर
डॉ. अब्दुल गफ्फूर सहरसा जिल्‍ह्यातील महिषीचे आमदार असून, राजदचे ते ज्‍येष्‍ठ नेते आहेत.
डॉ. चंद्रशेखर
राजद नेता चंद्रशेखर हे पप्पू यादव यांचे विरोधक आहेत. पप्पू यांचे प्रस्‍थ कमी करण्‍याची लालू यांच्‍यावर मोठी जबाबदारी सोपवली होती.
अनिता देवी
अनिता या रोहतास जिल्‍ह्यातील नोखा येथून विजयी झाल्‍या. त्‍यांच्‍या कुटुंबाची रोहतास जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर पकड आहे. त्‍या राजदच्‍या ज्‍येष्‍ठ महिला नेता आहेत.
विजय प्रकाश
जमुई येथून विजयी झालेले विजय प्रकाश यांनी 'हम'चे नेता नरेंद्र सिंह यांचा मुलगा अजय प्रताप सिंह यांना हरवले. ते राजदचे सक्रिय कार्यकर्ता आहेत.
मदन सहनी
हे सलग दुस-यांदा निवडून आले आहेत. यावेळी त्‍यांना गौडाबौराम विधानसभा मतदारसंघातून जदयूच्‍या तिकिटावर विजय मिळाला.
कपिल देव कामत
यांना बाबूबरही मतदार संघातून जदयूच्‍या तिकिटावर दुस-यांदा विजय मिळाला आहे. 2010 मध्‍ये त्‍यांचा राजदचे उमाकांत यादव यांनी पराभव केला होता. वर्ष 2005 मध्‍ये जदयूच्‍या तिकिटावर ते आमदार झाले होते.
मंजू वर्मा
मंजूदेवी या 2010 मध्‍ये पहिल्‍यांदा आमदार झाल्‍या. यावेळी त्‍या बरियापूर येथून जदयूकडून निवडून आल्‍या. 1980 मध्‍ये त्‍यांचे सासरे सुखदेव महतो भाकपाकडून निवडून आले होते. नंतर त्‍यांनी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश घेतला होता.
अशोक चौधरी
हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष असून, विधान परिषद सदस्‍य आहेत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाने कॉंग्रेसने 27 जागा जिंकल्‍या. त्‍यांचे वडील महावीर चौधरी हे 9 वेळा आमदार होते. दरम्‍यान, त्‍यांनी मंत्रीपदही भूषवले.
खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद
हे जदयूचे आमदार आहेत. त्‍यांनी सिकटा मतदारसंघात भाजपचे दिलीप वर्मा यांचा पराभव केला.
(फोटो- शेखर)
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पुढील स्‍लाइडवर वाचा किती मंत्रीपद राहू शकतात ?