आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीती न बाळगता सुशील मोदींनी मुलाचे लग्न करावे; लालू पुत्र तेजप्रतापांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी मुलाचा विवाह भीती न बाळगता करावा. विवाहाचा खेळखंडोबा करायला मी काही दहशतवादी किंवा गुन्हेगार नाही, असे राजदचे नेते तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्र्यांना कथित धमकावणारा व्हिडिआे गेल्या आठवड्यात चर्चेत आला होता. त्यानंतर वादंग निर्माण झाले होते.  


उपमुख्यमंत्री कार्यालयाने विवाहस्थळ बदलण्यात आल्याचे जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी तेजप्रताप यादव यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. सुशील मोदी यांच्या मुलाचा विवाह ३ डिसेंबर रोजी होणार आहे. बिहारमधील आैरंगाबादमध्ये आयोजित एका सभेत तेजप्रताप यांनी सुशील माेदी यांच्याविरोधात वक्तव्ये केली होती. मला त्यांनी विवाहाचे निमंत्रण दिले आहे. परंतु मी तिकडे विवाहासाठी गेलो तर त्यांचा सर्वांसमक्ष भंडाफोड करेन. त्यांचा विवाह समारंभ उद्ध्वस्त होईल, असे बोलताना त्यात तेजप्रताप दिसतात.  गेल्या आठवड्यात वृत्तवाहिन्यांतून तेजप्रताप यांच्या सभेचे फुटेज वारंवार झळकले होते. त्यावरून  तेजप्रताप यांना लक्ष्य केले गेले होते. 


सुशील मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात कारवाईचा फास आवळला आहे. त्यामुळे सुशील मोदी यादव कुटुंबाच्या रडारवर आले आहेत. मोदींनी यादवांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करून तपासाचे आदेश दिले आहेत. परंतु हा भाजपच्या नेत्याला लालू फोबिया झाल्याचा आरोप राजदने केला असून यादव कुटुंबावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...