आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu's Wife Rabri Faces Off Against Her Brother Sadhu Yadav In Bihar's Saran

राबडीदेवी यांच्याविरुद्ध बंधू साधू यादव लढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमध्ये सत्तासंघर्षाची स्पर्धा एवढी निर्माण झाली आहे की इथे सगेसोयरे आपल्या नात्याला तिलांजली देत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे आणि पक्षाचे माजी सदस्य साधू यादव यांनी बहीण राबडीदेवी यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. साधू यादव सारण मतदारसंघातून राबडी यांच्याविरुद्ध अर्ज भरणार आहेत.

जवळच्या नातेवाइकांचे निवडणूक युद्ध
- कोलकाता येथे दमदम मतदारसंघात तृणमूल काँग्रेस नेते सौगत राय यांचा सामना आपलेच बंधू तथागत रॉय (भाजप)शी होणार आहे.
- राजस्थानच्या दौसा जागेवर काँग्रेसने नमोनारायण मिणा यांना तिकीट दिले आहे. भाजपने त्यांचे धाकटे बंधू हरिश्चंद्र मिणा यांना तिकीट दिले आहे.
- बंगालच्या रायगंज मतदारसंघात प्रियरंजन दासमुन्शी यांची पत्नी दीपा यांच्यासमोर त्यांचे दीर सत्यरंजन (तृणमूल) यांचेच आव्हान आहे.