आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूपुत्राला 3 महिन्यांत सरकारी WhatsApp क्रमांंकावर आले 44000 विवाहाचे प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजिव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सरकारी व्हॉट्‍सअॅप क्रमांकावर सुमारे 44000 विवाहाचे प्रस्ताव आले आहेत. एवढेच नाही तर, उपवर मुलींनी व्हॉट्सअॅपवर त्यांची, कलर आणि हाईटसह फोटोही पाठवले आहेत. दरम्यान, बिहार सरकारने राज्यातील रस्त्यांच्या स्थितीबाबत सूचना देण्यासाठी तेजस्वी यादव यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला होता.

3 महिन्यांत आले विवाहाचे 44000 प्रस्ताव...
- उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तेजस्वी यादव यांच्या मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी एक व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला होता. त्याद्वारा विभागातील जनतेकडून रस्त्यांच्या स्थितीबाबत सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण, रस्त्यांच्या सूचना तर दूरच राहील्या. सरकारी क्रमांकावर तेजस्वी यांना विवाहाचे हजारो प्रस्ताव आले आहेत.
- सरकारी व्हॉट्सअॅप क्रमांकावर अवघ्या 3 महिन्यांंत 47000 मेसेज आले आहेत. त्यापैकी 3000 मेसेज हे रस्त्यांच्या सूचना सांगणारे आहेत तर उर्वरित सुमारे 44000 मेसेज हे उपवर मुलींचे असून त्यांनी चक्क राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा विवाहाचे प्रस्ताव पाठवले आहेत.
- 'मी परमेश्वराचा खूप आभारी आहे. सध्या अविवाहीत असल्याने हे मेसेज सहन करतो आहे. विवाहीत असतो तर मोठी समस्या झाली असती.', असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, उपवर मुलींनी तेजस्वी यांना पाठवले भन्नाट मेसेज...
(टीम- तेजस्वी यांना विवाहाचे प्रस्ताव पाठवणार्‍या मुलींचे नाव बदलले आहेत.)
बातम्या आणखी आहेत...