आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ नोंदी सुधारल्या तरी ३० लाख प्रकरणे निकाली, ‘भास्कर’ची सकारात्मक जिद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद/ राजेंद्र बतरा/ श्रीगंगानगर - दिल्लीनजीक नवीन सोसायटीमध्ये १८३५ लोक १७ वर्षांपासून आपल्या जमिनींसाठी संघर्ष करत आहेत. कारण या जमिनी भूमाफियांनी लाटल्या आहेत. हक्काच्या जमिनीसाठी यशपाल नावाचा एक युवक तर ८१४ दिवसांपासून धरणे धरत आहे.
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये हजारांहून अधिक प्रकरणे भाऊ-बहिणी, नणंद-भावजया, सासू-सुना यांच्यात चालू आहेत. अहमदाबादेत ओगणज गावांत पन्नास वर्षांपासून तीन पिढ्या १२ हजार चौरस फुटांच्या भूखंडासाठी न्यायालयात लढत आहेत.
ही फक्त तीन प्रकरणे नाहीत, जमिनीसंबंधी वादाचे हे एक वास्तव आहे. देशात सर्वांत जास्त खटले जमिनीशी संबंधितच आहेत. शिवाय सर्वांत जुना खटलाही असाच आहे. ‘दक्ष’च्या सर्वेक्षणानुसार, देशात प्रलंबित ७३ लाख दिवाणी दाव्यांपैकी ६६ टक्के जमिनींचेच आहेत. तज्ञांनुसार, जमिनीसंबंधीची प्रक्रिया आणि नोंदणी सुधारल्या तर न्यायालयातील ६० टक्के, म्हणजेच ३० लाख खटले निकाली निघतील. या मूळ नोंदी अचूक करण्यासाठी गेल्या २८ वर्षांत केंद्राने तीन वेळा मोहिमा सुरू केल्या. मात्र, अनेक राज्य सरकारांनी या निधीतून निम्मा पैसाही खर्च केलेला नाही. देशात १९८८ मध्ये सर्वप्रथम जमिनीसंबंधीच्या नोंदणी संगणकीकृत करण्याचे काम सुरू झाले. २००८ मध्ये सरकारने डिजिटायझेशन सुरू केले, राज्यांनी हे काम २०१७ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. मात्र, हा वेग मंद होता. म्हणून सरकारला अर्थसंकल्पात हा कार्यक्रम नव्याने सुरू करावा लागला.
५२वर्ष, तीन पिढ्या आणि अडकून पडलेला निकाल :
अहमदाबादजवळओगणज गावात जयंतीभाई पटेल यांना वारसा हक्काने १२ हजार चौरस मीटर जमीन मिळाली होती. मात्र, त्यांच्यामागे कोर्ट-कचेऱ्याचा त्रासही सुरू झाला. जयंतीभाई यांचे वडील सुरेशभाई यांनी १९६४ मध्ये सर्वांत अगोदर या जमिनीसाठी दावा केला होता. सुरेशभाई यांच्या मृत्युनंतर वादी म्हणून जयंतीभाई यांनी खटला चालवला. यात आतापर्यंत वादी आणि प्रतिवादींची संख्या झाली आहे. सर्व पक्षकारांचे मिळून एकूण १२ वकील बदलले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होत आहे.

भावाविरुद्ध बहिणी कोर्टात :
करणपूर (श्रीगंगानगर) येथील प्रभजोतकौरने वर्षांपूर्वी भाऊ दिलप्रीतसिंगविरुद्ध कोर्टात केस टाकली होती. विवाहानंतर आपण कॅनडात स्थायिक झाल्यानंतर भावाने वडिलांकडून मिळालेली जमीन सर्व संपत्ती हडपल्याचा तिचा दावा होता. हे प्रकरण अजून कोर्टात आहे. करणपूर येथील २८ एचमध्ये निर्मलजीतकौर आणि तिची सून राजविंदरकौर यांच्या ५४ बिघा जमिनीचा वाद सुरू आहे. श्रीगंगानगरमध्ये प्रभज्योत-दिलप्रीतसिंग तसेच निर्मलजित-राजविंदरकौर.जिल्हाभरात अशी हजार प्रकरणे कोर्टात सुरू आहेत. यातील काही खटले बहिणींनी भावाविरुद्ध टाकले आहे तर काही सासू-सुनांत सुरू आहेत. श्रीगंगानगरमध्ये अशी प्रकरणे अधिक आहेत. कारण, येथील जमिनी अत्यंत सुपीक आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जमिनिशी संबंधित किती आहेत खटले....
-तज्ञांच्यामते काय आहे यावर उपाय...
बातम्या आणखी आहेत...