आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल: दार्जिलिंगमध्ये मुसळधार, भूस्खलनात 38 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दार्जिलिंगमधील सिमुलबाड़ी येथे जोरदार पावसामुळे पूल वाहून गेला - Divya Marathi
दार्जिलिंगमधील सिमुलबाड़ी येथे जोरदार पावसामुळे पूल वाहून गेला
दार्जिलिंग - पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात जोरदार पावसामुले भूस्खलन होऊन ढिगाऱ्याखाळी 38 जणांचा दबून मृत्यू झाला. सोमवारपासून उत्तर बंगालमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दार्जिलिंगमधील कलिम्पोंग आणि मिरिक येथे भूस्खलन झाले. दार्जिलिंग - सिक्कीमला देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (एनएच) 55 वर देखील दरड कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे अधिकारी व कर्मचारी मलबा हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.
ट्वॉय ट्रेनसेवा विस्कळीत
दार्जिलिंग हिमालय रेल्वेचे सहायक अभियंता एस. शेखर म्हणाले, 'मेरी व्हॅली येथे भूस्खलन झाले असल्याने ट्वॉय ट्रेन सध्या बंद करण्यात आल्या आहेत. मंगळवारी चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वेमार्गावरील चिखल आणि माती हटवण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. प्रथम एनएच 55 वरील मलबा हटवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे ट्रॅक सुरु केला जाईल.'
लेहमध्ये 150 प्रवासी अडकले
जम्मू-काश्मीरमध्ये लेह विमानतळावर 150 पेक्षा जास्त प्रवासी अडकले आहेत. सर्वजण दिल्लीला केव्हा पोहोचतो याची वाट पाहात आहेत. गो एअरवेजच्या फ्लाइटने ते पाहाटे 5.15 वाजता दिल्लीसाठी उड्डाण करणार होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दार्जिलिंगमध्ये लँडस्लाइडचे फोटो