आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्‍ये अतिवृष्‍टीचा इशारा, इतर राज्‍यांना बचाव मोहिम राबविण्‍यास प्रतिबंध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/डेहराडून- उत्तराखंडमध्‍ये निसर्गाशी लढा देत लष्‍कराच्‍या जवानांची झुंज सुरु आहे. उत्तराखंडमध्‍ये बहुतांश जिल्‍ह्यांमध्‍ये पाऊस सुरु आहे. बद्रीनाथ, रुद्रप्रयाग आणि केदारनाथला मुसळधार पडला. तर जोशीमठमध्‍ये पाऊस थांबला आहे. मात्र, नद्यांमधील पाण्‍याची पातळी वाढण्‍याचा धोका लक्षात घेऊन किना-याजवळ राहणा-या नागरिकांना हलविण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. उत्तराखंडमध्‍ये पुढील 48 तासांमध्‍ये अतिवृष्‍टीचा इशारा देण्‍यात आला आहे. त्‍यामुळे बचाव कार्यात मोठा अडथळा येण्‍याची भीती असून पूरस्थिती आणखी बिकट होण्‍याची शक्‍यता आहे. अजुनही उत्तराखंडमध्‍ये 10 हजारांपेक्षा जास्‍त पर्यटक अडकले आहेत.

गुप्‍तकाशीत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु होता. आता तिथे पावसाचा जोर कमी झाला आहे. तर पौडीत ढगफुटी झाली आहे. थल्‍लीसैणजवळ पैठाणी भागत ढग फुटले. त्‍यामुळे पुरात अनेक घरे वाहून गेली आहेत. पाऊस आणि दाट धुक्‍यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. हेलिकॉप्‍टरचा वापर होत नसून जवानांनी जमिनीवरुनच मोहिम सुरु ठेवली आहे.

दरम्‍यान, बद्रीनाथला गेलेले महाराष्‍ट्रातील सर्व भाविक सुरक्षित असल्‍याची माहिती महाराष्‍ट्र सरकारने दिली आहे. बद्रीनाथला जाणारे सर्व रस्‍ते बंद झाले आहेत. तिथे सरकारचे हेलिकॉप्‍टर पोहोचले आहे. परंतु, पावसामुळे सर्व भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्‍यास विलंब होऊ शकतो.

पोलिसांचे पथक केदारनाथला पोहोचले आहे. केदारनाथ आणि गौरीकुंड येथे मृतदेहांची ओळख पटविण्‍याचे काम सुरु आहे. बद्रीनाथमध्‍येच सध्‍या 5 हजार भाविक फसलेले आहेत. रुद्रप्रयाग आणि गुप्‍तकाशीत भुस्‍खलनामुळे दोन ठिकाणी रस्‍ते बंद झाले आहेत. त्‍यामुळे बुलडोजर मागवून ढिगारे बाजुला करण्‍याचे काम सुरु आहे.

पुढे वाचा... इतर राज्‍यांना समांतर बचाव मोहिमांना उत्तराखंड सरकारने घातला प्रतिबंध