नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये शनिवारी उत्साहात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. जम्मू-काश्मिरात ५ टप्प्यांत मिळून ६५ टक्के मतदान झाले असून मागील २५ वर्षांतील हे विक्रमी मतदान आहे. दहशतवादाला झुगारून काश्मिरी जनतेने लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन फुटीरतावाद्यांना चोख उत्तर दिले आहे.
झारखंडमध्ये भाजपची सत्ता; जम्मू-काश्मिरात किंगमेकर
सर्वच एक्झिट पोलनी झारखंडमध्ये भाजपला बहुमत दिले, तर जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही बहुमत नाही. पीडीपी सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुस-या स्थानावर राहून किंगमेकरची भूमिका बजावू शकते, असा सर्वेक्षणांचा अंदाज आहे.