आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी पंडितांना धमकी, दहशतवाद्यांनी म्‍हटले, घाटी सोडा किंवा मरण्‍यासाठी तयार रहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीर पंडितांनी निडर होऊन काश्‍मीर राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, लष्‍कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने काश्मिरी पंडितांना धमकी दिली असून, त्‍यांनी तत्‍काळ घाटी सोडावी किंवा मरण्‍यासाठी तयार राहावे, असा इशारा दिला आहे.
अनेक ठिकाणी लावले पोस्‍टर...
> लष्‍कर-ए-इस्लामने पुलवामामध्‍ये अनेक ठिकाणी या बाबत पोस्टर चिटकवले आहेत.
> त्‍यावरील मजकूर इंग्रजी आणि उर्दूत आहे.
म्‍हटले, आरएसएस एजंट....
> हे पोस्‍टर्स चिटकवऱ्यांवर सैन्‍य दल किंवा सरकारकडून अजून काहीही कारवाई करण्‍यात आली नाही.
> काश्मिरी पंडित हे राष्ट्रीय स्वयं सेवक संघ म्‍हणजेच 'आरएसएस'चे एजंट असल्‍याचे यात म्‍हटले आहे.
> काश्‍मीरच्‍या स्‍वातंत्र्यांसाठी लढा सुरूच राहील, असेही यात म्‍हटले.
> लष्‍कर-ए- इस्‍लाम दहशतवादी संघटना मागील एका वर्षांपासून शांत होती.
> आता ती पुन्‍हा सक्रिय झाली आहे, हाच संदेश त्‍यांनी या पोस्‍टर्सच्‍या माध्‍यमातून दिला आहे.
> या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहे लष्‍कर-ए-इस्लाम ?
बातम्या आणखी आहेत...