आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणारे तीन अतिरेकी ठार; एका अतिरेक्याला जिवंत पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या तीन अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी चकमकीत खात्मा केला. एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले आहे. साेमवारी दुपारी सुरू झालेली चकमक मंगळवारी पहाटे २ वाजेपर्यंत चालली. यासोबतच १० जुलैला अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ल्यात सहभागी असलेले सर्व अतिरेकी ठार करण्यात आले आहेत. हल्ल्यात ८ यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते. 


सोमवारी दुपारी कुलगाम जिल्ह्यातील बोनगामजवळ लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यानंतर उडालेल्या चकमकीत एक जवानही शहीद झाला.


दहशतवाद्यांनी केला होता लष्कराच्या ताफ्यावर हल्ला 
- सोमवारी श्रीनगरच्या काजीगुंडमध्ये दहशतवाद्यांनी आर्मीच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर चकमक सुरू झाली. 
- दहशतवाद्यांच्या शोधासाठी सिक्युरिटी फोर्सेने संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन चालवले. दहशतवाद्यांबरोबर रात्री 2 वाजता एन्काऊंटर संपले. 
- मृत 3 दहशतवाद्यांपैकी एक असलेला यावर बशीर स्थानिक दहशतवादी होती. अबू फुरकान आणि अबू माविया दोन्ही विदेशी दहशतवादी हते. बशीर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात लश्कर ए तोयबामध्ये सहभागी झाला होता. फुरकान, अबू इस्माइलच्या मृत्यूनंतर आता साऊथ काश्मीरमध्ये लश्करचा प्रमुख बनला होता. 
- इस्माइलनेच 10 जुलैला अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचे नेतृत्त्व केले होते. 


यावर्षी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान 
- दहशतवाद्यांना सुरक्षित वातावरण मिळण्याआधीच त्यांना ठार मारण्यासाठी यावर्षी हिवाळ्यातही भारतीय सैन्याने ऑपरेशन ऑल आऊट राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- आयजी जुल्फिकार यांनी सांगितले की, यावर्षी हिवाळ्यात ऑपरेशनचा वेग कमी होण्याऐवजी अधिक वाढेल. गुजरात निवजडणूक संपल्यानंतर सीआरपीएफतडे काश्मीरमधील कारवाईसाठी अदिक जवान असतील. 
- सुत्रांच्या मते, सीआरपीएफचे सुमारे 5,000 जवान डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काश्मीरला पोहोचतील. 
- यावर्षी सिक्युरिटी फोर्सेसच्या कारवाईत जे 200 दहशतवादी मारले गेले त्यापैकी 40 दहशतवादी डिस्ट्रीक्ट कमांडर किंवा त्यापेक्षा वरच्या लेबलचे होते. यापैकी अनेक दहशतवादी चार-पाच वर्षांपासून अॅक्टीव्ह होते. साधारणपणे दहशतवाद्यांनी शस्त्र हाती घेतले की, 2-3 वर्षांपेक्षा अधिक काळ ते जगत नाहीत. पण काश्मीर पोलिस तरुणांबाबत बरीच नरमाईची भूमिका घेत आहेत. 
- श्रीनगरचे आयजी मुनीर खान यांच्यामते, दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्यांनी फार गंभीर गुन्हा केलवेला नाही. त्यांना घरी परतण्याची संपूर्ण संधी दिली जात आहे. या मुलांना ठाण्यात जाण्याचीही गरज नाही, थेट घरी जा असेही सांगण्यात आले आहे. या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशीही केली जाणार नाही. खान म्हणाले, माफी म्हणजे माफीच. 


टेरर फंडिंगमध्ये 40 हून अधिक जणांवर कारवाई, दगडफेक झाली कमी 
- काश्मीरमध्ये तैनात असलेले सुरक्षा अधगिकारी यांच्या मते, टेरर फंडिंगमध्ये सहभागी असलेल्यांची लगाम खेचल्याने दगडफेक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. एनआयएने काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने अशा बँक अकाऊंटची माहिती मिळवली, ज्यात नेहमी विदेशातून पैसा येत होता. अशा 40 हून अधिक खात्यांना सील करण्यात आले आहे. हा पैसा कृषी उत्पादन किंवा इतर सामानाच्या एक्सपोर्टच्या मोबदल्यात पाठवल्याचे दाखवले जात होते. 
- फंडिंगमध्ये सहभागी असलेले बहुतांश लोक पांढरपेशे होते आणि त्यांच्या ओव्हर ग्राऊंड कॅडरच्या मदतीने ते दगडफेकीसाठी पैसा पाठवत होते. यापैकी बहुतांश लोक काश्मीरच्या बाहेरच्या तुरुंगांत पाठवले असल्याने सहजपणे येणारा पैसा थांबला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS

बातम्या आणखी आहेत...