आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Last Phase Of Voting For Assembly Election In Bihar Today

बिहार विधानसभा : ३९ कोटी रुपये जप्त; आज अंतिम टप्प्याचे मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली । लोजपचे प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी एकत्र भोजनाचा आनंद घेताना. गेल्या अनेक दिवसांपासून बिहारच्या निवडणूक प्रचारात पासवान व्यग्र होते. बुधवारी मात्र निवडणुकीची धामधूम संपली. - Divya Marathi
दिल्ली । लोजपचे प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी एकत्र भोजनाचा आनंद घेताना. गेल्या अनेक दिवसांपासून बिहारच्या निवडणूक प्रचारात पासवान व्यग्र होते. बुधवारी मात्र निवडणुकीची धामधूम संपली.
नवी दिल्ली - बिहारमध्ये गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या अंितम टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान होत असून या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी व प्राप्तिकर विभागाने या निवडणूक प्रचार काळात आतापर्यंत ३९ कोटींची रोकड जप्त केली असून यात काही बनावट नोटा, परकीय चलनाचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ही रोकड जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी िदलेल्या माहितीनुसार, या पथकांनी ७०.४० लाख रुपयांचे नेपाळी चलन जप्त केले असून भारतीय चलनातील २४.५१ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याशिवाय ६०.३० लाख रुपयांचे परकीय चलन पण पथकांनी हस्तगत केले आहे.

गेल्या काही दिवसांत प्राप्तिकर िवभागाच्या पथकांनी दिल्ली व मुजफ्फरपूरमध्ये टाकलेल्या धाडींमध्ये १९ कोटी रुपये जप्त केले आहेत. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व संशयित हवाला मध्यस्थांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागांनी कारवाई केली.

८२७ उमेदवारांचे भवितव्य ठरणार
आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान होईल. यात ८२७ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होईल. यात प्रामुख्याने राज्य मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचा समावेश आहे. ५७ जागांपैकी नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या २ मतदारसंघांत ७ वाजता मतदान सुरू होऊन दुपारी ३ वाजता संपेल. उर्वरित मतदारसंघांत मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. पहिल्या चारही टप्प्यांप्रमाणेच या शेवटच्या टप्प्यातही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी व नितीश-लालूप्रसाद यादवप्रणीत महाआघाडीत प्रमुख लढत होत आहे. यात सहा जागांवर एमआयएमनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे ३८ उमेदवार या टप्प्यात नशीब अाजमावत आहेत. जदयूचे २५ उमेदवार आहेत.

५७ जागा, ८२७ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

विजय आमचाच... दोन्हींचा दावा
शेवटच्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडल्यानंतर मतमोजणीबद्दल जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता असली तरी भाजपप्रणीत रालोआ व जदयूप्रणीत महाआघाडी या दोघांनीही राज्यात आपलाच विजय होईल, असे दावे केले आहेत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची ठरलेली ही निवडणूक भाजपच्या दृष्टीने आगामी काळात अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

८ तारखेला मतमोजणी
पाच टप्प्यांत पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ नोव्हेंबरला होत आहे. भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणूक निकालाकडे यामुळे सबंध देशाचे लक्ष लागून आहे.

जप्त केलेली सामग्री
{१.६७ लाख लिटर मद्य. { ८५७.९१ िकलो गांजा { ७.८४ लाख किलो महुआ { ३३६ ग्रॅम हेरॉइन. { ८.६६ किलो सोने.