आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर चढणार होती लग्नाची शेरवानी, बॉर्डरवर शहीद होऊन तिरंग्यात आला मुलगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवान घनश्याम गुर्जरचे लग्न पक्के झाले होते. त्याची तयारीही सुरु झाली होती. - Divya Marathi
जवान घनश्याम गुर्जरचे लग्न पक्के झाले होते. त्याची तयारीही सुरु झाली होती.
पापडदा (राजस्थान)- श्रीनगरमधील जकूरा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला घनश्याम गुर्जर याच्या पार्थिवावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वडीलांनी जेव्हा अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा दिला तेव्हा संपूर्ण गावाला रडू कोसळले. काही महिन्यांनी घनश्यामचे लग्न होणार होते. त्याची जोरात तयारी सुरु होती. संपूर्ण खरेदी झाली होती. पण घनश्याम शहीद झाल्याचे वृत्त गावात पोहोचले आणि सर्वच संपले.
पाकिस्तान मुर्दाबादचे नारे
- घनश्याम गुर्जरच्या अंत्ययात्रेत तब्बल 100 गावांमधील लोक सामिल झाले होते.
- यावेळी उपस्थितांनी 'घनश्याम तेरा यह बलिदान-कभी न भूले हिंदुस्तान' असे नारे दिले.
- पार्थिक बघितल्यानंतर घनश्यामची आजी सुशीला देवी, आई जानकी देवी यांची शुद्ध हरपली.
- अंत्यदर्शनासाठी पार्थिक घराच्या समोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली काही काळ ठेवण्यात आले होते.
- घनश्यामच्या भावाचा मुलगा गौरवने मुखाग्नी दिली. सिमा सुरक्षा दलाच्या 26 जवानांनी तीन वेळा हवेत फायर करुन सलामी दिली.
- त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक रामप्रसाद बैरवा यांनी सांगितले, की तो वक्तशिर होता. त्याच्या शिस्त आवडायची. कामाला तो समर्पित होता. त्याला भारतीय लष्करातच जायचे होते.
- अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा काही लोकांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले.
दिवाळीनंतर होणार होते लग्न
- घनश्यामचे लग्न पक्के झाले होते. दिवाळीनंतर लग्नाची तारीख काढण्यात येणार होती.
- पण त्यापूर्वीच तो शहीद झाला. त्याचे वडील रामकिशोर म्हणाले, की मला मुलाच्या लग्नाची तयारी करायची होती. पण आता त्याचे पार्थिव खांद्यावर घेऊन जातोय.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शहीद घनश्यामच्या पार्थिवावर असे करण्यात आले अंत्यसंस्कार... वडीलांनी असा दिला खांदा... आणि इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...