आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Both Daughters And Son Of Colonel M N Rai Will Be Send To Indian Army

कर्नल राय यांच्या दोन्ही मुलींना, मुलाला लष्करात पाठवणार, म्हणाले वडील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- शहीद कर्नल एम. एन. राय यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांची मोठी मुलगी अलकाने डोळ्यांत अश्रूंचा बांध तयार झाला असतानाही लष्करी सॅल्युट करुन पप्पांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. अलकाच्या धैर्याचे सर्वांनाच कौतुक वाटले.
यावेळी बोलताना कर्नल राय यांचे वडील म्हणाले, की राय यांच्या दोन मुली अलका, रिचा आणि लहान मुलगा आदित्य यांना भारतीय लष्करात पाठवणार आहे. वडीलांकडून अपूर्ण राहिलेले काम या दोन मुली करतील.
- 31 जानेवारी रोजी कर्नल राय यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे.
- राय यांना 26 जानेवारी रोजी युद्ध सेवा मेडलने गौरविण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मित्राला म्हटले होते, की पुढील वर्षी अशोक चक्र मिळवून दाखवणार
पुढील स्लाईडवर बघा, कर्नल राय यांचे शोकमग्न कुटुंब... लष्करी अधिकाऱ्यांनी वाहिनी श्रद्धांजली...