आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Last Salute To Dr.A.P.J. Adbul Kalam In Rameshwaram

‘जनाजे की नमाज’सोबतच ‘भारतमाते’चा जयजयकार! रामेश्वरममध्‍ये कलामांना निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहिदाप्रमाणे कलाम यांचे पार्थिव सैन्याच्या १०५ एमएम फिल्ड तोफेवरून दफनविधीसाठी नेण्यात आले. - Divya Marathi
शहिदाप्रमाणे कलाम यांचे पार्थिव सैन्याच्या १०५ एमएम फिल्ड तोफेवरून दफनविधीसाठी नेण्यात आले.
मदुराईपासून कलाम साहेबांचे गाव १६६ किलोमीटर दूर आहे. रस्त्यात कलामांच्या पोस्टर्सनी व्यापले नाही असे एकही गाव, वाडी किंवा मोहल्ला नाही. महामार्गावरच्या दुकानदारांनीही कलामांची कॅलेंडर्स चिकटवली आहेत. रामेश्वरमला जाणारी असो की येणारी गाडी असो, सर्वांवर कलामांची छायाचित्रे आहेत.समुद्रावर बांधलेला एकमेव लोहमार्ग पामबन पूल पार करता करता रात्रीचे १२ वाजले होते. तरीही रस्त्यावर लोकांची गर्दी होती. प्रत्येक चौकात कलामांची तसबीर आणि तिच्यासमोर पेटत्या मेणबत्त्या ! तीन दिवसांपासून रामेश्वरम झोपलेलेच नाही.
बुधवारी कलामांचे पार्थिव रामेश्वरमला पोहोचले तेव्हा हवाई दलाच्या विमानात इतर १६ जणही होते. त्यात त्यांच्यासाठी जेवण तयार करणा-यापासून ते सल्लागारांचा समावेश होता. आपल्या साहेबांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या आठवणीने त्यांचे मन उचंबळून येत होते आणि राहून राहून डोळे पाणावत होते.कलामांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले. तेथे त्यांचे मोठे बंधू मोहम्मद मारयेकयर वाट पाहत बसले होते. दररोज सायंकाळी आपल्यापेक्षा १७ वर्षांनी लहान भावाच्या फोनची वाट पाहत अगदी तसेच. भावाचे पार्थिव पोहोचले तेव्हा ते त्याकडे खिन्नमनस्कतेने निरखत बसले. मग काचेच्या वरूनच थोपटू लागले. थोडा वेळ थबकले... मग जवळच ठेवलेली पांढरी फुले उचलली आणि काचेवर ओळीने मांडू लागले.

कलामांचे पार्थिव सुपुर्द-ए-खाक करण्याच्या काही तास आधी सर्वसामान्य जनतेसाठी खुले अंत्यदर्शन थांबवण्यात आले तरीही लोकांचे लोंढेच्या लोंढे येतच होते. गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत कलामांच्या घरापासून चार किलोमीटर लांब लोकांची रांग लागलेली होती. कलामांनी त्यांच्या घराला ‘जीवन गॅलरी’ नाव दिले होते. गुरुवारी तेथूनच त्यांनी आपल्या जीवनाचा अखेरचा प्रवास सुरू केला. दर्शनी भागावरच कुटुंबाचे एक दुकान आहे.

त्याचे नाव आहे ‘एपीजे कलाम सी -शेल्स शॉप.’ घरामध्ये नमाज- ए- जनाजा पढला जात होता. घराच्या आसपासच्या सर्व गल्ल्यांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. छत, खिडक्या, भिंतीवरच नव्हे तर लोक एकमेकांच्या पायावर पाय देऊन उभे होते. घराच्या समोरच नारळाच्या झावळ्यांची एक झोपडी आहे. तिच्या आडोशाला उभ्या राहून काही महिला आपल्या या शेजा-याच्या अंत्यदर्शनाची वाट पहात होत्या. पदराने डोळे पुसत आणि मग हातवर करून काही दुआ मागत. उभा राहून पायांना गळका लागलेल्या काही वृद्धांनी रस्त्याच्या कडेलाच बसकन मारली. त्या सर्वांनाच आपल्या छोट्याशा गावच्या या मोठ्या कलामांचा अभिमान वाटत होता. दहा किलोमीटर लांबीच्या प्रवासात गर्दीने दुतर्फा खच्चून भरलेल्या जमावाने त्यांना अखेरचा निरोप दिला आणि मैदानावर पंतप्रधानांसह मोठमोठ्या व्हीव्हीआयपींनी त्यांचे स्वागत केले....!