आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतचा शेवटचा व्हिडिओ आणि फोटो आला समोर, सोबत जाणाऱ्याने सांगितली ही कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहीम याला सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बाबाला सुनारियां जेलपर्यंत सोबत देणाऱ्या हनीप्रीतला प्रशासनाने पुन्हा पाठवले होते. आता हनीप्रीतचा कुठेच ठावठिकाणा लागत नसल्याने ती विदेशात पळून गेल्याच्या चर्चेला उधाण आले, म्हणून तिच्याविरुद्ध लूक आऊट नोटिस जारी करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी 7 दिवसांनंतर हनीप्रीतचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
 
4 लोकांसमवेत दिसली हनीप्रीत...
- व्हिडिओमध्ये एक कारला पोलिसांनी घेरलेले दिसत असून व्हिडिओही बनवला आहे. यानंतर ते गाडीत बसून निघून जातात. काही पोलिस फोटोही काढताना दिसताहेत. यासोबतच काही फोटो व्हायरल झाले. यात हनीप्रीत काही लोकांसोबत दिसत आहे. सोबतच एक फोटो आणखी आहे, ज्यात हनीप्रीतसह तिच्या सोबत्यांची नावे आणि पत्तेही लिहिलेले आहेत.
- सोशल मीडियावर एका चिठ्ठीचा फोटोही व्हायरल होत आहे. या चिठ्ठीत सर्वात वर लिहिले आहे की, विकास नंबर 3/783. त्याखाली विकासने आपली स्वाक्षरी केली आहे.
- नंतर लिहिले आहे की, मी हनीप्रीत इन्सां सुरक्षितरीत्या शिपाई विकास नं. 3/783 फतेहाबाद सोबत जात आहे. यानंतर तिने स्वाक्षरी केलेली आहे.
- यासोबतच 3 लोकांची नावे आणि पत्ते तसेच स्वाक्षरी आहे, यात संजय रामजीदास वासी 330/18, आर्यनगर, रोहतक आणि मोबाइल नंबर, यानंतर वेदप्रकाश छोटूराम वासी, राजली, जि. हिसार, तिसरे नाव आहे जितेंद्र कुमार फकीरदचंद वासी, घर नं. 417/17, जिल्हा कॉलनी, झज्जर.
- खाली लिहिले आहे की, आम्ही वरील व्यक्ती बाबा राम रहीमची कन्या हनीप्रीतला आमच्यासोबत आज दि. 25 ऑगस्ट 2017 रोजी सहीसलामत आमच्या जबाबदारीने व हनीप्रीतच्या मर्जीने नेत आहोत. तिला घरी पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे.
- हनीप्रीतने गुरमित राम रहीमला पळून जाण्यासाठी कट रचल्याचे एक नवे प्रकरण समोर आले आहे. गायब होण्याआधी हनीप्रीतने जेलमधून निघून संजय नावाच्या व्यक्तीच्या घरी सीक्रेट मीटिंग केली होती. या गोष्टीचा खुलासा हनीप्रीत तुरुंगात नेणाऱ्या जितेंद्र नावाच्या व्यक्तीने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...