आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Election News What Prominent Muslim Thinks About Modi

नरेंद्र मोदींबाबत काय वाटते या 10 महत्त्वाच्या मुस्लीम व्यक्तींना... वाचा त्यांची मते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर लागलेले 2002 च्या गुजरात दंगलींबाबत आरोप सिद्ध झालेले नसले, तरी या मुद्यांवरून त्यांना वारंवार घेरले जाते. देशातील अल्पसंख्याक समुदायाने वारंवार या मुद्यावरून मोदींच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. लोकसभा निवडणुकीत ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि निवडणुकीची प्रक्रियाही जवळपास पूर्ण झाली आहे. पण निकालाआधीच विविध जनमत चाचण्यांमधून त्यांच्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत देशातील मुस्लीमांची त्यांच्याबाबतची मते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
काय वाटते हाशीम अन्सारी यांना?
राम जन्म मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाच्या न्यायालयीन खटल्यातील सर्वात जुन्या चेह-यांपैकी एक म्हणजे हाशीम अन्सारी. मोदींच्या पंतप्रधान बनण्याच्या शक्यतांवर ते म्हणतात, ' मोदींना शिक्षा मिळायला हवी होती. 1992 मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा त्यांनी अयोध्‍येला येण्यासठी कारसेवक जमवले होते. ते पंतप्रधान झाले, तर देशाचे किमान 20 तुकडे होतील, आणि त्यासाठी मुस्लीम जबाबदार राहणार नाहीत.' भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्याचे मत मांडणा-या अंसारी यांच्या मते मोदी विकासाचे राजकारण करत असले तरी, राम मंदिर बनवणे हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे.
पुढील स्लाईडमध्ये... देशातील महत्त्वाच्या मुस्लीम व्यक्ती आणि बुद्धीजीवींचे मोदींबाबतचे मत...