मुंबई - नेस्ले इंडियाने म्हटले आहे, की त्यांचे उत्पादन मॅगी नुडल्स पूर्णपणे सुरक्षीत आहे आणि तीन सरकारी प्रयोगशाळांमध्ये ते सुरक्षीत असल्याचा अहवाल दिला आहे. कंपनीच्या या निवदेनानंतर त्यांच्या शेअरमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेस्ले इंडियाने प्रसिद्धीस दिलेल्या निवदेनात म्हटले आहे, 'मुंबई हायकोर्टाने निर्धारित केलेल्या तीन प्रयोगशाळांचे अहवाल मिळाले आहे. मॅगीच्या 9 पदार्थांचे सर्व 90 नमुने तपासण्यात आले आहे. त्यात शिसे प्रमाणानुसार असल्याचे आढळले आहे.'
याआधी देशाच्या महत्त्वाच्या ग्राहक न्यायालय एनसीआरडीसीने गुरुवारी मॅगीच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले नऊ नमुने तपासण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या दोन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी झाली. मॅगीमधील शिसे किती प्रमाणात आहे यासंबंधी हे प्रकरण होते. सरकारने ऑगस्टमध्ये नेस्ले इंडियाविरुद्ध गुन्हा दाखल करत 640 कोटींचा दावा दाखल केला होता.