आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती लॉकअपमध्ये; सोडवायला गेलेल्या पत्नीला पोलिस म्हणाला, तुझी एक रात्र आम्हाला दे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारीबाग (झारखंड) - पतीला तुरुंगातून सोडवायला गेलेल्या पत्नीकडे पोलिस अधिकार आणि त्याच्या लेखनिकाने (रायटर) शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार गेल्या वर्षी ऑक्टबरमध्ये घडला होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा महिलेच्या पतीने 1 सप्टेंबर रोजी हजारीबाग विभागाचे पोलिस महानिरीक्षक यांचे दार ठोठावून पोलिस अधिकारी आणि त्याच्या रायटरविरोधात तक्रार दिली.
काय आहे प्रकरण
- सेंट्रल कोल्डफिल्डस लिमिटेड (सीसीएल) येथील कर्मचाऱ्याचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पत्नीसोबत भांडण झाले होते.
- पतीसोबतच्या भांडणाची तक्रार घेऊन महिला पोलिस स्टेशनला गेली. तिथे पोलिस अधिकारी लिलेश्वर महतो याच्याकडे महिलेने पतीला समज देण्याची विनंती केली.
- महतोने महिलेच्या पतीला पोलिस स्टेशनला बोलावून घेतले आणि लॉकअपमध्ये बंद केले. त्याला शिवीगाळ केली. हे जेव्हा महिलेला कळाले तेव्ही ती धावत पोलिस स्टेशनला आली आणि पतीला सोडण्याची विनवणी करु लागली.
काय म्हणाले पोलिस अधिकारी
- मांडू पोलिस स्टेशनचे प्रभारी लिलेश्वर महतो यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले, हे सर्व आरोप निराधार आहेत.
- महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या कारवाई केली होती. त्याची चार्जशीट देखील आहे. त्याने पोलिसांना धक्काबुक्की केल्यानंतर अटक केली होती.
- त्याला तुरुंगात टाकल्यामुळे महिलेने हे बिनबुडाचे आरोप केले आहेत. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गतसह 9 गुन्हे दाखल आहे.
- स्टेशन प्रभारी म्हणाले, हे सर्व आरोप खोटे आहेत. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले होते. तिथेही आम्ही आमची बाजू मांडली.
पुढील स्लाइडमध्ये, इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या प्रकरण
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...