19 ते 25 नोव्हेंबर हा आठवडा 'वर्ल्ड हेरिटेज वीक' म्हणून साजरा केला जातो. 'वर्ल्ड हेरिटेज वीक सीरीज'च्या माध्यमातून आम्ही आज
आपल्याला जोधपूर येथील मेहरानगड किल्ल्याची माहिती देत आहोत. दक्षिण दिल्लीतील महरोली भागातील कुतुब मीनार पेक्षाही मेहरानगड किल्ला उंच आहे.
मेहरानगड किल्ला 120 मीटर उंच डोंगरावर बांधण्यात आला आहे. कुतुब मीनारची उंची 73 मीटर आहे. किल्ल्यावर सती माताचे प्राचीन मंदिर आहे. महाराजा मानसिंह यांचे निधन 1843 मध्ये झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने चितेवर बसून आपला प्राण सोडला होता. मानसिंह यांच्या पत्नीच्या स्मृतिपित्यर्थ सती माता मंदिर उभारण्यात आले होते. 1000 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मेहरानगड किल्ल्याची हूबेहूब प्रतिकृती किशनगड रुपात बहावलपूर सिंध पाकिस्तानात आहे.
पाकिस्तानने केला होता हल्ला...
1965 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने मेहरानगड किल्ल्यावर चाल केली होती. भारतीय लष्करानी पाकिस्तानी सैन्याला परतून लावले होते. पाकिस्तानी सैन्याने या किल्ल्यावर आपली सीमा चौकी स्थापन केली होती. त्यानंतर ताशकंद करारानुसार हा किल्ला पुन्हा भारताच्या ताब्यात देण्यात आला होता. मेहरान किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्यात ठिकठिकाणी भूलभुलैये आहेत. त्यामुळे किल्ल्यावर जाणारा व्यक्ती गोंधळून जातो.
किल्ल्याची सीमा 10 किलोमीटर
मेहरानगड किल्ल्याची सीमा 10 किलोमीटर आहे. किल्ल्याची भिंत 20 ते 120 फुट उंच असून रुंदी 12 ते 70 फुटपर्यंत आहे. किल्ल्याच्या वळणदार मार्गात सात आरक्षित दुर्ग बनवण्यात आले आहेत. किल्ल्याला एकूण चार प्रवेशद्वार आहेत. किल्ल्यात अनेक भव्य महल आहेत. अद्भुत नक्षीदार दरवाजे, जाळीच्या खिडक्या आहेत.
500 वर्षे पुरातन किल्ला...
जोधपूरचा शासक राव जोधा यांनी 12 मे 1459 मध्ये या किल्ल्याची पायाभरणी केली होती. मात्र महाराज जसवंत सिंह (1638-78) यांच्या काळात हा किल्ला तयार झाला. किल्ल्यात मोती महल, फूल महल, शीश महल, सिलेह खाना, दौलत खाना पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
1965 च्या युद्धात देवीने केले होते किल्ल्याचे रक्षण...
चामुंडा माता ही जोधपूरच्या शासकाचे कुळदैवत होते. राव जोधा यांची चामुंडा मातावर अपार श्रद्धा होती. राव जोधा यांनी 1460 मध्ये मेहरानगड किल्ल्याजवळ चामुंडा मातेची मंदिर बनवले होते. 1965 च्या भारत-पाक युद्धात चामुंडा माताने मेहरानगड किल्ल्याचे रक्षण केले होते, असे मानले जाते. या युद्धात पाक सैन्याने जोधपूरला लक्ष्य बनवले होते.
हॉलिवूड सिनेमांची झाली आहे शूटिंग
मेहरानगड किल्ल्यावर हॉलिवूडचा सुपरहीट सिनेमा ’डार्क नाइट’ची शूटिंग झाली होती. त्यानंतर हा किल्ला हॉलिवूड सिनेमांचे एक खास डेस्टीनेशन बनला आहे. ब्रूस वेनला कैद, तुरुंगावर हल्ला आदी दृश्ये चित्रित करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मेहरानगड किल्ल्याचे विलोभनिय फोटो...