आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दहशतीने उडाली झोप, खचलेले रस्‍ते पाहून लोकांनी घर सोडून काढला पळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/धनबाद- झारखंडमधील धनबादमध्‍ये सकाळी झोपेतून उठल्‍या-उठल्‍या लोकांमध्‍ये दहशत पसरली. घडलेच असे की, रेल्‍वेगेटकडे जाणारा रस्‍ता हा पूर्णपणे खचला होता. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्‍याने लोक भयभीत झाले. येथील जमीन खचल्‍याने सुमारे 50 मीटर रस्‍ता गायब झाला आहे. जीव मूठीत धरून येथून पळ काढण्‍याचा मार्ग लोकांनी स्‍वीकारला.
जवळच रेल्‍वे ट्रॅक
ही घटना धनबाद-चंद्रपुरा रेल्‍वे लाइनपासून सुमारे 150 मीटर अंतरावर घडली. या लाईनवरून शताब्दी एक्सप्रेससह अन्‍य महत्‍त्वाच्‍या रेल्‍वे धावतात. जवळच एक झोपडपट्टी वसलेली आहे. येथे सुमारे 1000 लोक राहतात.
का घडली घटना?
बीसीसीएल, भारत कोकिंग कोल लिमिटेड या कंपनीने येथे आधी चुकीच्‍या पद्धतीने खोदकाम केले होते. त्‍यामुळे ही घटना घडली असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. बीसीसीएलच्‍या अधिका-यांनी या लोकांना दुसरीकडे राहण्‍याचे आवाहन केले आहे. एका महिन्‍यापूर्वीही येथे अशाच प्रकारे रस्‍ते खचले होते. खोदकामानंतर खड्डा व्‍यवस्‍थित बुजला नाही, असे येथील रहिवाशांचे मत आहे.
सुरक्षित ठिकाणी होईल पुनर्वसन
" घटनास्‍थळावर असलेल्‍या झोपडपट्टीमधील नागरिकांचे योग्‍यप्रकारे पुनर्वसन करण्‍यात येईल. या लोकांसाठी दास टोलाजवळ सुरक्षित जमीन देण्‍यात येत आहे. लोकांनी येथून स्‍थलांतराला सुरूवात केली. लवकरच येथील सर्व लोकांचे
स्‍थलांतर होईल."
- सुनील निगम, सहाय्यक महाव्यवस्थापक.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, असे खचले रस्‍ते...