आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi News AAP Leader Kumar Vishwas Amethi Booked In Lucknow

कुमार विश्वास यांच्याविरोधात उत्तरप्रदेशात धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - आम आदमी पार्टीचे (आप) नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात लखनऊमध्ये धार्मिक भावना भडकवल्याच्या आरापोखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी सेवा समितीने त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
समितीचा आरोप आहे, की विश्वास यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पोलिस अधिकारी सतीश गौतम म्हणाले, की मी वादग्रस्त व्हिडिओ पाहिला असून प्रकणाचा तपास सुरु आहे. बरेलीमध्येही विश्वास यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण दाखल आहे.
अमेठी येथून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे आव्हान दिल्यानंतर लखनऊमध्ये कुमार विश्वास यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. अंडी फेकणा-या युवकाने स्वतःला समाजवादी पक्षाचा कार्यकर्त्या असल्याचे सांगितले होते. त्यासोबतच आरोप केला होता, की विश्वास धार्मिक भावनांचा सन्मान ठेवत नाहीत.