आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Tejpal: Court Rejected Tarun's Plea

तेजपाल प्रकरणी शोमा चौधरींसह चौघांना गोवा पोलिसांचे समन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी तहलकाच्या माजी व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्यासह चार साक्षीदारांना समन्स बजावले आहे.
तेजपाल प्रकरणी शोमा चौधरी यांच्यावर पीडितेवर दबाव टाकण्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी व्यवस्थापकीय संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. आज (बुधवार) बजावलेल्या या समन्समध्ये शोमा चौधरींसह चार साक्षीदारांना पणजी येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. इ-मेल आणि लेखी स्वरुपात चौधरी यांच्यासह इशान तनखा, शौगत दासगुप्ता आणि जी. विष्णु यांना समन्स बजावण्यात आले आहे.
शोमा चौधरी तेजपाल विरोधातील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडित पत्रकाराने केला होता. गोवा पोलिसांनी दिल्लीमध्ये यांची साक्ष नोंदवून घेतली होती. आता न्यायिक दंडाधिका-यांसमोर पुन्हा यांचे निवेदन नोंदवून घेतले जाणार आहे.