आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Actress Shweta Menon Molested By Congress MP?

कामसुत्रच्या जाहिरातीतून प्रसिद्धीस आलेल्या श्वेताची काँग्रेस खासदाराकडून छेडछाड?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्लम - बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली मल्याळम् चित्रपटातील अभिनेत्री श्वेता मेनन हिने तिच्यासोबत काँग्रेस नेत्याने छेडछाड केल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. श्वेताने सांगितले आहे की, कोल्लम येथे शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान एका लोकप्रतिनीधीने तिच्यासोबत छेडछाड केली. ती म्हणाली, 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. माझी छेड काढण्यात आली आहे.' श्वेताने कार्यक्रमादरम्यान याबद्दल वाच्यता केली नाही. कारण त्यामुळे तिथील परिस्थिती बिघडली असती, असे तिने म्हटले आहे. मात्र तिने छेडछाड करणा-या नेत्याचेही नावही सांगितलेले नाही.
श्वेताने ज्या कार्यक्रमात तिची छेड काढल्याचा आरोप केला आहे, त्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजमध्ये काँग्रेस खासदार एन.पितांबर कुरुप दिसत आहेत. ते श्वेताला स्पर्ष करताना फुटेजमध्ये दिसत आहेत.
मात्र कुरुप यांनी या प्रकरणापासून हात झटकले आहेत. कोल्लम लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे 73 वर्षीय कुरुप म्हणाले, या प्रकरणात मला विनाकारण ओढले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी माझे निरपराधत्व अनेक पुरावे देऊन सिद्ध करु शकतो.
श्वेताने दावा केला आहे की, या प्रकरणाची मौखिक माहिती तिने जिल्हाधिकारी बी. मोहनन यांना फोनकरुन दिली होती. याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली होती. मात्र मोहनन यांनी श्वेताने तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी या प्रकरणी जिल्हाधिका-यांशी चर्चा केली आहे. या प्रकरणी अजून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. श्वेताचे म्हणणे आहे की, मल्याळम चित्रपट कलाकार असोसिएशनसोबत चर्चा केल्यानंतर लिखित तक्रार देण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.