आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर - आसाराम यांचे संकट कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. त्यांचा एक-एक शिष्य त्यांच्या विरोधात जात आहे. आसाराम गेल्या 25 दिवसांपासून जोधपूर जेलमध्ये बंदीस्त आहेत. या काळात त्यांच्या अनेक शिष्यांनी तुरुंगात त्यांची भेट घेतली. मात्र त्यांचे पुत्र नारायण साई एकदाही त्यांच्या भेटीला गेलेले नाहीत. नारायण साई बुधवारी जोधपूरमध्ये आले होते, त्यामुळे आसाराम आणि नारायण साई यांच्यासंदर्भातील अफवांचे पिक जोरात होते. नारायण साई यांनी आसाराम यांची भेट टाळली असली तरी, ज्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आसाराम यांच्यावर ठेवण्यात आला आहे, त्या फार्म हाऊसला त्यांनी भेट दिली.
बुधावारी आसाराम यांच्या छिंदवाडा येथील गुरुकुलच्या मुलींच्या वसतीगृहाच्या वॉर्डन शिल्पी उर्फ संचिता गुप्ता सत्र न्यायालयात शरण आल्या आहेत. तर, दुसरीकडे नारायण साई यांची आणखी एक अवैध कुटी उघडकीस आली आहे. राजस्थानमधील चंदपुरा येथील आसाराम यांच्या एका आश्रमाला नोटीस बजावण्यात आली आहे. हा सर्व घटनाक्रम भविष्यात आसाराम यांचे संकट आणखी वाढणार असल्याचे संकेत देत आहे.
पुढील स्लाइडमध्ये नारायण साई यांची सविस्तर मुलाखत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.