आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Jammu Kashmir Keran Sector Encounter On Loc

केरन भागातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानच जबाबदार -बिक्रमसिंगांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना हुसकून लावण्यासाठी भारतीय लष्काराने सुरु केलेली मोहिम 15 व्या दिवशी फत्ते झाल्याचा दावा लेफ्टिनेंट जनरल संजीव चाचडा यांनी केला आहे. गेल्या 14 दिवसांपासून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानामध्ये या भागात चकमक सुरु होती.

दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कार दहशतवाद्यांना सहकार्य करत असल्याचा आरोप भारताचे लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी केला आहे. भारतीय सीमाभागातील घुसखोरीला पाकिस्तान जबाबदार असून याबाबत लष्कराकडे ठोस पुरावे असल्याचेही सिंग यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केरन सेक्टरमधील घुसखोरीच्या मुद्यावर लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यात बिक्रमसिंग यांनी लष्काराच्या मोहिमेची माहिती दिली.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'लष्कराच्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त'