आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Narendra Modi Bjp Pm Candidate Nitish Kumar Hunkar Rally

मोदींचा पुन्हा बिहार दौरा; गुजरात पोलिसांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भारतीय जनता पक्षाच्या येथील हुंकार रॅलीवेळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार पुन्हा पाटण्यात येणार आहेत. रविवारी (27 ऑक्टोबर) हुंकार रॅलीवेळी आठ साखळी स्फोट झाले होते. या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मोदी येत आहेत. दरम्यान, मोदींच्या सुरक्षेसाठी गुजरातहून पाटण्यासाठी निघालेल्या गुजरात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला असून त्यात दोन पोलिस कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून आठ जखमी आहेत. गुजरात पोलिसांच्या गाडीला उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद येथे एका ट्रकने धडक दिली.
मोदींच्या सुरक्षेसाठी गुजरातहून पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांसह मोठा फौजफाटा पाटण्याकडे रवाना झाला आहे. पाटण्याच्या गांधी मैदानात झालेल्या स्फोटानंतर बिहार पोलिसांनीही मोदींच्या आजच्या दौ-यासाठी कडक सुरक्षा तैनात केली आहे. बिहारला जाण्याआधी मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. पुण्याला ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, पाटणास्फोटातील संशयीताचा मृत्यू