आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजा-याकडून लैंगिक शोषणाचा गायिकेचा आरोप, तर आश्रमाची ब्लॅकमेलिंगची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : रामचंद्रपुरा मठाचे पुजारी राघवेश्वरा भारती स्वामी आणि गायिका प्रेमतला दिवाकर.

बेंगळुरू - कर्नाटक्या शिमोगा जिल्ह्यातील रामचंद्रपुरा मठाचे पुजारी राघवेश्वरा भारती स्वामी यांच्या विरोधात एका गायिकेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे. पीडित गायिका प्रेमलता दिवाकर यांची मुलगी अंशुमती शास्त्री हिने तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे ही तक्रार दाखल झाल्यानंतर कन्नड पोलिसांनी अंशुमतीची आई प्रेमलता आणि वडील दिवाकर यांना अटक केली आहे.
मठातील कर्मचा-यांनी प्रेमलता आणि त्यांच्या पतीवर संताना ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार आधीच दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनिवारी पोलिसांनी प्रेमलता आणि त्यांच्या पतीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शनिवारपर्यंत त्यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

राघवेश्वरा स्वामींवर लावलेले आरोप
अंशुमती शास्त्रीने तक्रारीत म्हटले आहे की, 'राघेवेश्वरा स्वामी यांनी गेल्या काही वर्षात आपल्या आईचे अनेकवेळा लैंगिक शोषण केले आहे. गायिका प्रेमतला या मठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सादरीकरण करायच्या.' पोलिसांनी त्यांच्या राघवेश्वला यांच्या विरोघात कलम 354 अ (लैंगिक शोषण) आणि 506 (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रेमलता यांनी आधीही अनेकदा तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण मठातील कर्मचा-यांनी तसे करू दिले नाही, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर मठातील कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमलता यांनी तक्रार करायची नसेल तर तीन कोटी रुपयांची मागणी केली होती.
स्वामी आधीही अडकले होते वादात
राघवेश्वरा भारती स्वामी 2010 मध्येही एका वादात अडकले होते. भारती यांना बनावट सेक्स व्हिडिओच्या आधारे फसवण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मेंगलोरमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली होती.

पुढील स्लाइडवर पाहा, आश्रमातील राघवेश्वरा भारती स्वामींचे फोटो...