आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती जिवंत; पत्नीने बनावट मृत्यू प्रमाणपत्र देऊन पळवला विमा क्लेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिस्सार (हरियाणा)- पैशांच्या लोभापायी पत्नीने पतीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवले. त्याच्या विम्याच्या रकमेवर दावा सांगून ती बेपत्ता झाली. तिने पतीची सर्व आेळखपत्रेही सोबत नेली. हिस्सारचा हा पीडित पती स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी आता पोलिस ठाण्यात हेलपाटे घालत आहे. त्याचे आयडी पुरावे नसल्याने पोलिस तक्रार नोंदवण्यास राजी नाहीत.

हिस्सार येथील आझादनगरातील किसान कॉलनीत सतीशकुमार राहतो. पूजा सांगणे पौरोहित्याचा त्याचा व्यवसाय आहे. याच कामासाठी तो दोन महिन्यांसाठी तेलंगणाला गेला होता. फोनवरून तो कुटुंबाच्या संपर्कात होता. मात्र याच दरम्यान त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र बनवून विम्यासाठी दावा सांगितला. विम्याची ४० हजार रुपयांची रक्कम घेऊन ती फरार आहे. १६ वर्षांपूर्वी आपला विवाह फतेहाबादच्या राजबालाशी झाल्याचे सतीशने सांगितले. संसार सुरळीत सुरू होता. आपल्या पत्नीच्या नावे त्याने हिस्सारमध्ये जमिनीही घेतल्या. दोन महिन्यांपूर्वी पूजापाठ करायला तो तेलंगणाला गेला. घरी परतल्यावर पत्नी घरात दिसली नाही. त्याने शेजारी नातेवाइकांकडेही चौकशी केली. मात्र कोणाकडून काहीच खबर मिळेना. सतीश पुन्हा घरी आला. घरातील रोख रक्कम, जमिनीची कागदपत्रे, निवडणूक आेळखपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका इतर सर्व आेळखपत्रे गायब झाल्याचे त्याला दिसले. पलंगाखाली त्याला स्वत:च्या मृत्यूचे प्रमाणपत्र सापडले. ११ जून रोजी आपण एलआयसी कार्यालयात जाऊन चौकशी केल्याचे सतीशने पोलिसांना सांगितले. तेथील व्यवस्थापकाने दस्तऐवजांप्रमाणे आपला मृत्यू झाल्याचे सांगितले. पत्नीने ४० हजारांचा धनादेश नेल्याचेही त्यांनी सांगितले. तक्रार नोंदवण्यासाठी त्याने पोलिस ठाणे गाठले. मात्र आयडी प्रूफ नसल्याने तक्रारही नोंदवणे शक्य झाले नाही. त्याने पोलिसांना झाला प्रकार सांगितला. त्यांनी तक्रार स्वीकारली. मात्र, एफआयआर नोंदवून घेतला नाही. आता स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी आपण लढत असल्याचे सतीशने सांगितले. आयडी प्रूफ नव्याने बनवण्याच्या कामाला तो लागला आहे. पत्नीने थोडक्या पैशांसाठी आपला विश्वासघात केल्याचे दु:ख त्याने व्यक्त केले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)