आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Celebrity MPs Are A Rare Sight In House

सेलिब्रिटींना संसदेसाठी वेळ मिळेना; रेखाची 7 तर सचिनची केवळ 3 वेळा उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सेलिब्रिटी खासदारांची संसदेबद्दलची उदासिनता हा एक गंभीर विषय बनत आहे. एप्रिल 2012 पासून सचिन तेंडूलकर केवळ तीन वेळा राज्यसभेमध्ये उपस्थित होता, तर रेखाने केवळ सात वेळा संसदेच्या सत्रात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे या सेलिब्रीटींच्या नियुक्त्यांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संसदेतील उपस्थितीच्या बाबतीत सेलिब्रिटींचे प्रमाण शैक्षणिक, नागरी सेवा, पत्रकारिता आणि विज्ञान यांसारख्या क्षेत्रातील मान्यवरांच्या तुलनेत फार कमी आहे.
एखाद्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल खासदारपदी नियुक्त करण्यात आलेले सेलिब्रिटी संसदेत मोजक्याच वेळेस दिसतात. राज्यसभेसाठी 1999 ते 2005 पर्यंत नियुक्त करण्यात आलेल्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर असो अथवा स्व. चित्रकार एम एफ हुसैन (1986-1992), क्रिकेटर सचिन अथवा रेखा हे केवळ बोटावर मोजता येईल एवढ्याच वेळेस संसदेत दिसले. त्यामुळे या खासदारांच्या नियुक्तींवर संसदेत प्रश्न उपस्थित होत आहेत. मागील आठवड्यात आरजेडी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी या खासदारांच्या नियुक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
निवृत्त झाल्यानंतरही सचिनजवळ संसदेसाठी वेळ नाही
सचिन तेंडूलकर निवृत्तीनंतर संसदेला जास्तीत जास्त वेळ देईल असे वाटत होते. मात्र निवृत्तीनंतरही सचिन केवळ एकदाच, तेही मागील नोव्हेंबरमध्ये संसदेत हजर झाला. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप सचिन आणि रेखा यांनी संसदेचे तोंड देखील पाहिले नाही. डिसेंबर 2013 पासून या महिन्याच्या जुलैपर्यंत सचिन केवळ एकदाच संसदेत उपस्थित झाला होता.
खासदार निधी वापराबद्दल उदासिनता
तेंडूलकर आणि रेखा यांनी राज्यसभेत दोन वर्षे झाले असूनही खासदार निधीमधील एक रुपयासुध्दा खर्च केलेला नाही. या वर्षाच्या फेब्रूवारीमध्ये सांख्यिकी मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर जाहिर केलेल्या आकडेवारीत ही बाब लक्षात आली आहे.
राज्यसभा खासदारांना आपल्या पसंदीचा एक जिल्हा निवडण्याचा अधिकार असतो. ते आपल्या खासदार निधीतून त्या जिल्ह्यातील विकासकामे करू शकतात. यासाठी राज्यसभा खासदारांना दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतात. यासाठी सचिन तेंडूलकरने मुंबई (सब-अर्बन) या जिल्ह्याची निवड केली होती. मात्र त्याने अजून एकही विकास काम या भागात केले नाही. तर रेखाने जिल्हा निवडण्याचीही तसदी घेतली नसल्याचे आढळले आहे.