आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Snoop Gate Case Now In Supreme Court

हेरगिरी प्रकरणाची चौकशी थांबवा, महिलेच्या कुटुंबाची सुप्रीम कोर्टाकडे विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरात सरकारचे तथाकथिक हेरगिरी प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणाची केंद्र आणि गुजरात सरकारद्वारे केली जाणारी चौकशी थांबवण्याची मागणी मंगळवारी 'त्या' महिलेच्या कुटुंबाने कोर्टाकडे केली. या प्रकरणामुळे कुटुंबाच्या खासगी आयुष्याला धोका निर्माण झाल्याने, ही विनंती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याची तयारी केली होती. पण नंतर सरकारमधील घटकपक्षांनीच यावर आक्षेप घेतल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. काही दिवसांपूर्वीच सरकारने लवकरच एक आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनीही काही दिवसांपूर्वीच १६ मे पूर्वी एका न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करून चौकशी सुरू करणार असल्याचे म्हटे होते. पण एनडीए सरकार सत्तेत येताच यूपीए सरकारचे सर्व निर्णय रद्द करणार असल्याचे उत्तर त्यांना जेटली यांनी दिले होते.
काय आहे प्रकरण?
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कोब्रापोस्ट आणि गुलेलडॉटकॉम या संकेतस्थळांनी एक वृत्त प्रसारीत केले होते. त्यात गुजरात सरकराने 'साहेब' यांच्या सांगण्यावरून एका महिलेची हेरगिरी केल्याचे सांगण्यात आले होते. गुलेल ने या प्रकरणाशी संबंधित काही फोटो आणि ऑडियो-रिकॉर्डिंग पुरावे म्हणून सादर करून मोदी यांच्या सांगण्यावरून शाह यांनी ही हेरगिरी केल्याचा दावा केला होता. पुढे शाह यांनी हेरगिरी झाल्याचे मान्यही केले होते. महिलेच्या पित्याच्या विनंतीवरूनच हेरगिरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणी गुजरात सरकारने विरोधकांच्या मागणीवर चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे.