आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Up Dgp\'s Controversial Statement About Rape Incidents

पोलिस ठाण्यातच गँगरेप, मुरादाबादमध्ये बदायू? DGP म्हणाले, या तर रूटीन घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तरप्रदेशात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच समोर आलेली एक घटना तर अधिकच भयावह आहे. त्याचे कारण म्हणजे ज्या पोलिस अधिका-यांवर सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनीच पोलिस ठाण्यात एका महिलेवर गँगरेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील आहे. येथे रात्रभर एका महिलेला बंधक बनवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. विशेष म्हणझे पोलिस महासंचालकांना (डीजीपी) जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी बलात्काराच्या घटनांसंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अशा घटना रूटीन असल्याचे डीजीपी म्हणाले आहेत. अशा प्रकारच्या घटना दरवर्षी होतच असतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान मुरादाबाद येथे एका 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप लावला आहे.


पोलिस ठाण्यात अत्याचाराचा आरोप
हमीरपूर जिल्ह्याच्या भरुआ सुमरेपूर ठाण्यात एक उपनिरीक्षक आणि दोन कॉ़न्सटेबल यांनी पोलिस ठाण्यातच महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या तावडीत असलेल्या पतीला भेटण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी आपल्याला त्याठिकाणी बंद केले आणि अत्याचार केला असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आणि दोन्ही कॉन्सटेबल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
पुढे वाचा - डीजीपींचे वादग्रस्त वक्तव्य