आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Activists Booked For \'celebrating\' Ananthamurthy\'s Death

कन्नड लेखक अनंतमूर्ती यांच्या मृत्यूनंतर फटाके उडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती)
नवी दिल्ली- पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले कन्नड लेखक यू. आर. अनंतमुर्ती यांच्या मृत्यूनंतर फटाके उडवणाऱ्या भाजप आणि हिंदूवादी संघटनांच्या कथित कार्यकर्त्यांविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
चिकमंगळूर येथील मुदिगेरे पोलिसांनी आज (शनिवार) कथित भाजप आणि हिंदू जागरण वैदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दंगल, उपद्रव घडवून आणणे, जमावबंदी आदी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांजवळ या घटनेचे व्हिडिओ फुटेज आणि फोटो आहेत. यावरुन लवकरच दोषींना अटक केली जाणार आहे. मंगळूर पोलिस आयुक्त आर. हितेंद्र यांनी सांगितले आहे, की आम्ही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आता पुढील कारवाई केली जाईल.
काय आहेत आरोप
अनंतमुर्ती यांचे निधन झाल्याची वार्ता पसरल्यावर मंगळूरमधील चार ठिकाणी आणि चिकमंगळूर येथील एका ठिकाणी फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला. यानंतर कॉंग्रेस युवा संघटना आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. फटाके उडवणाऱ्यांवर कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी या कार्यकर्त्यांनी केली.
हिंदू संघटनांचा इन्कार
अनंतमूर्ती यांचा मृत्यू झाल्यावर आनंद व्यक्त केल्याचा हिंदू संघटनांनी इन्कार केला आहे. यासंदर्भात बजरंग दलाचे प्रदेश अध्यक्ष शारण पंपवेल म्हणाले, की अशा स्वरुपाचा उत्सव संघटनेकडून आयोजित करण्यात आला नव्हता. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी असेल केले असावे. अनंतमुर्ती यांच्याशी त्यांचे काही व्यक्तिगत नव्हे केवळ वैचारिक मतभेद होते.
पुढील स्लाईडवर बघा, फटाके फोडून आनंद व्यक्त करताना कार्य़कर्ते...