आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Election 2014 Amit Shah Statement

आझमगड अतिरेक्यांचा अड्डा : अमित शहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आझमगड/बलिया - आझमगड हा अतिरेक्यांचा अड्डा असल्याचा सनसनाटी आरोप करून भाजपचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. शहा यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. आझमगड मतदारसंघात रविवारी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शहा बोलत होते. आझमगड हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे. समाजवादी पक्षाचे सरकार दहशतवादाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या लोकांच्या सुटकेसाठी वकिली करीत आहे. यूपीत सरकारचा अजिबात धाक उरलेला नाही. गुजरात स्फोटातील आरोपी आझमगडचेच होते. त्यांना गृहराज्यमंंत्री असताना मी अटक केली होती. त्यानंतर गुजरातमध्ये दहशतवादाची एकही घटना घडलेली नाही, असे शहा म्हणाले.